आशाताई बच्छाव
जाफराबाद माधवगिरी महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास भाविकांची गर्दी
जाफराबाद तालुका माहोरा प्रतिनिधी… मुरलीधर डहाके
दिनांक 23/06/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील जनेश्वर महादेव गोसेवा आश्रम जवखेडा ठेंग ता.जाफराबाद जि. जालना येथे जनेश्वर गोसेवा आश्रमाचे आदरणीय सर्वेसर्वा ज्ञानेश्वर माऊली महाराज व प.पू. महेशगिरी महाराज, प.पू. राघवगिरी महाराज व सर्व साधू संतांच्या उपस्थितीत परम पूजनीय स्वामी (सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम नाशिक) माधवगिरी महाराजांचा , जनेश्वर महादेव गोसेवा आश्रमात भव्य दिव्य असा २१जून २०२४ शुक्रवार रोजी अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. बाबाजींनी आपल्या वाणीतून नव तरुणांना मार्गदर्शन केले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.






