Home अमरावती आमचा खासदार मागासवर्गीय आहे म्हणून त्यांना अशी वागणूक: सर्वधर्मसमभाव विचाराचे लोक तिथे...

आमचा खासदार मागासवर्गीय आहे म्हणून त्यांना अशी वागणूक: सर्वधर्मसमभाव विचाराचे लोक तिथे बसू नये म्हणून कृत्य-यशोमती ठाकूर.

146

आशाताई बच्छाव

1000490434.jpg

आमचा खासदार मागासवर्गीय आहे म्हणून त्यांना अशी वागणूक: सर्वधर्मसमभाव विचाराचे लोक तिथे बसू नये म्हणून कृत्य-यशोमती ठाकूर.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावतीत खासदार कार्यालय कुलूप तोड पकडणे आता चांगलेच तापलेचे दिसून येत आहे.१५ कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आमचा खासदार मागासवर्गीय आहे म्हणून त्यांना अशी वागणूक केल्या जात असल्याचा खळबळ जनक आरोप काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी केला आहे. शिवाय या कट कारस्थानामध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आणी आमदार रवी राणा यांचा हात असल्याचे अनेक आरोप त्यांनी केले आहे. दरम्यान यशोमती ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की, एखादा समजदार पालकमंत्री असतात तर त्यांनी वेळेत हा प्रश्न मार्गी लावून हा विषय संपला असता. मात्र असे न होता त्यांनी अतिशय खालच्या पद्धतीने वागणूक आम्हाला दिली. आमचा खासदार हा एक मागासवर्गीय समाजाचा आहे. म्हणून मीटिंगमध्ये देखील त्यांना तिसऱ्या ठिकाणी बसवतात. आल्यावर त्यांना खुर्ची ही मिळत नाही. खासदार बळवंत वानखडे यांना उभे राहावे लागते. तसेच यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आमचा खासदार एक मागासवर्गीय समाजाचा आहे. म्हणून मीटिंगमध्ये देखील त्यांना तिसऱ्या ठिकाणी बसवतात आल्यावर त्यांना खुर्ची ही मिळत नाही. खासदार बळवंत वानखडे यांना उभे राहावे लागते. अतिशय आपणांस पद वागणूक त्यांना दिली जाते. या काट-कारस्थानामागे आमदार रवी राणा आणि अनिल बोंडे हे या मागचे सूत्रधार आहे. सर्वधर्मसमभाव या विचाराचे काँग्रेसचे लोक त्या ठिकाणी बसली नाही पाहिजे या विचारातून हे कृत्य झाले आहे. मात्र या गोष्टीला आम्ही घाबरत नाही. आज राज्यात तुमचे सत्ता आहे उद्या आमची सत्ता येईल. इथून पुढे पण भरपूर काम करायचे आहे. मात्र या कामात जर अशा पद्धतीने आठवे निर्माण केले जात असतील तर त्यालाही उत्तर दिलेच पाहिजे.