Home बुलढाणा वरवंड ते रूईखेड टेकाळे रोडच्या साईटला केला होता काळया मातीचा वापर, युवा...

वरवंड ते रूईखेड टेकाळे रोडच्या साईटला केला होता काळया मातीचा वापर, युवा मराठा न्यूज वर बातमी प्रसारित होताच रोडवर आला मुरूम,पण शेतकऱ्याच्या बांधावरची काळी माती रोडवर टाकली त्याचं काय?

119

आशाताई बच्छाव

1000490390.jpg

वरवंड ते रूईखेड टेकाळे रोडच्या साईटला केला होता काळया मातीचा वापर, युवा मराठा न्यूज वर बातमी प्रसारित होताच रोडवर आला मुरूम,पण शेतकऱ्याच्या बांधावरची काळी माती रोडवर टाकली त्याचं काय?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत करण्यात येत असलेल्या वरवंड ते रुईखेड टेकाळे रस्त्याच्या कामात चक्क काळ्या मातीचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता शेतकऱ्यांच्या बांधावरची काळी माती त्या ठेकेदारांने चक्क रोडच्या साईडला भरण्यासाठी वापरली त्यानंतर त्याची तक्रारही दाखल झाली होती तक्रारर दाखल झाल्यानंतर चक्क ठेकेदाराने क***** मातीच्या वरून मुरूम टाकण्यात सुरुवात केलेली आहे.पण काही शेतकऱ्यांच्या शेतात मध्ये रोडच्या साईडच्या नाल्याचे खोदकाम करण्यात आलेमात्र काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रोडच्या साईडच्या नालीचे काम आद्यपही करण्यात आलेले नाही जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास काही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते जर शेतकऱ्यांचे नुकसान झालंतर ठेकेदार त्याची भरपाई देईल का किंवा अधिकारी देतील का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उपस्थितीत राहिलेला आहे ठेकेदार रोडच्या साईडच्या नाल्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे.