Home बुलढाणा समृद्धी मार्गावर वाहनांची विशेष तपासणी मोहीम मद्यप्राशन केलेल्या वाहनचालकावर कारवाई…

समृद्धी मार्गावर वाहनांची विशेष तपासणी मोहीम मद्यप्राशन केलेल्या वाहनचालकावर कारवाई…

28
0

आशाताई बच्छाव

1000490386.jpg

समृद्धी मार्गावर वाहनांची विशेष तपासणी मोहीम मद्यप्राशन केलेल्या वाहनचालकावर कारवाई…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलडाणा :-समृद्धी मार्गावर होणाऱ्या अपघाताना आळा घालण्यासाठी परिवहन विभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार गुरूवार, दि. 20 जून 2024 रोजी राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत 42 वाहनांची सिंदखेडराजा समृद्धी टोल नाक्यावर तपासणी करण्यात आली. यात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या एका वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पर्यायी चालकाची व्यवस्था होईपर्यंत वाहन सुरक्षितरित्या उभे करण्यात आले. तसेच 3 प्रवासी बसवर कारवाई करण्यात आली.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्त्यावर होत असलेल्या अपघाताचे विशेषत: खासगी बसेसने होत असलेल्या अपघाताबाबत उपाययोजना करण्यात येत आहे. यात जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक यांची वेगवेगळी पथके तयार करून खासगी प्रवाशी बसची तपासणी करण्यात येत आहे. बसचालकांची मद्य प्राशनाबाबत ब्रीथ अनालायझरद्वारे तपासणी करण्यासाठी दोन दिवस विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक सीमा खेते, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुरज कोल्हे, स्वप्नील वानखेडे, राधिका चव्हाण यांनी सहभाग घेतला.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात मलकापूर नाका, समृध्दी महामार्ग व बुलडाणा शहर अशा तीन ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान दि. 20 जून रोजी तीनही पथकाद्वारे एकूण 172 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 7 बसचे चालक मद्य प्राशन करुन वाहन चालवित असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमानुसार कारवाई करण्यात आली. तसेच इतर बाबतीत दोषी आढळून आलेल्या 9 वाहनावरही कार्यवाही करण्यात आली. मद्य प्राशन करून वाहन चालवित असलेली वाहने सुरक्षित पार्क करण्यात आली. चालकाची पर्यायी व्यवस्था करण्यात आल्यानंतर वाहन सोडण्यात आले. सदर कारवाई यापुढे देखील सुरु ठेवण्यात येणार आहे, याची सर्व बसचालक आणि मालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here