आशाताई बच्छाव
शारदाताई फाउंडेशनतर्फे वृक्षवाटप
सोनई,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)
शारदाताई फाउंडेशनतर्फे नेवासे तालुक्यातील शंभर गावातील महिला सदस्यांना आ. शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून व नेवासा तालुका बचत गटाच्या प्रणेत्या सुनीताताई गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली वटपौर्णिमेनिमित्त वृक्षांचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील महिलांनी या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. निसर्ग आपल्याला भरभरून ऑक्सिजन पुरवतो. त्याची कृतज्ञता व निसर्ग राखण्यासाठी तालुक्यातील महिला बचत गटातील सदस्य महिलांना वटपौर्णिमेनिमित्त एक झाड लावूया हा कार्यक्रम करण्याचे आवाहन
सुनीता गडाख यांनी केले होते. वाटप केलेल्या रोपाचे योग्य संगोपन करून वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावेत, व वृक्षारोपण केल्याने पुढील
पिढ्यांना शुद्ध हवा मिळवून देण्यासाठी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन गडाख यांनी केले.






