आशाताई बच्छाव
भदंत विनय बोधी महाथेरो धम्म चळवळ पुरस्काराने सन्मानित
भंडारा -अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या ९ जून २०२४ च्या वाढदिवसाचे औचित साधून शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे भदंत विनय बोधी महाथेरो यांना 23 जून 2024 ला सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. भदंत विनय बोधी महाथेरो हे मागील ३० वर्षापासून धम्म चळवळीत सक्रिय असून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता नेहमी अग्रेसर असतात .शांतीवन बुद्ध विहाराला नेहमी भेट देऊन त्या कार्यक्रमात वेळोवेळी उपस्थित राहत असतात. व संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये धम्म कार्य करीत असतात. त्यांनी यापूर्वी बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनामध्ये त्यांनी वेळोवेळी सक्रिय सहभाग नोंदविला आहे व बौद्ध धम्माची लोकसंख्या कशी वाढेल याकरिता सातत्याने प्रयत्न करीत असतात .त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या हस्ते धम्म चळवळ सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी श्रामनेर बुद्धपाल उपस्थित होते.