Home भंडारा संजीव भांबोरे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल...

संजीव भांबोरे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून

138

आशाताई बच्छाव

1000424769.jpg

संजीव भांबोरे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून

 

भव्य आरोग्य शिबीर, फराळवाटप, वृक्षारोपण व विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार समारोह कार्यक्रमाचे 9 जूनला शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथेआयोजन

भंडारा : कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा व शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी द्वारा दि.09 जून 2024 रोज रविवारला दुपारी 3 वाजता पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी ( चिचाळ ) येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर, फळवाटप ,वृक्षारोपण कार्यक्रम व विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेतर्फे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

मा. संजीव भांबोरे हे सामाजिक , राजकीय क्षेत्रात कार्यरत असून मागील पंचवीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून अनेक वर्तमानपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळालेला आहे . त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन 09 जूनला कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा मार्फत भव्य आरोग्य शिबीर, फराळवाटप व विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक कार्यकर्तांचा मानचिन्ह व सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे.

कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर जिल्ह्यात म्हणून ओळख आहे, अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करून गोरगरीब रूग्णांची सेवा केली जाते. “खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा” ह्या दृष्टीकोनातून जिल्हाभर कार्य चालू आहे. तसेच पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी दवाखाना मार्फत पुढाकार घेण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा चे डॉ.अक्षय कहालकर, शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रेषिताताई कहालकर, सचिव मीराताई कहालकर, पंकज कहालकर, शितल चामट आदी सहकार्य करीत आहेत.