आशाताई बच्छाव
माहोरा येथील मतदान शांततेत
माहोरा येथील नवरदेव स्वप्निल खराट यांनी बजावला मतदानाचा हक्क
माहोरा प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की, माहोरा येथे दिनाक 13 मे2024 रोजी सकाळी 7 वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली. मतदानाला मतदारांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. माहोरा येथील मतदान केंद्रावर माहोरा येथील नवरदेव स्वप्नील सुनील खाराट यांनी बांशिग बांधलेले असतांनाही आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे लग्न लागण्यासाठी दुसऱ्या गावी जाणार होते तरी त्यांनी मतदान करूनच जाण्याचा निर्णय घेतला . वऱ्हाड मंडळी यांनी सुध्दा त्यांच्या या निर्णयाला होकार दिला व त्या नवरदेवाचे अभिनंदन सुध्दा केले. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी लांबच- लांब रांगा लागल्या होत्या तरी पण मतदारांनी सर्वांच्या आगोदर नवरदेव स्वप्निल खराट यांना मतदान करण्यासाठी जाऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्याची सर्व मतदारांनी दखल घेऊन मतदान झाल्या नंतर उपस्थित मतदारांनी त्यांचे कौतुक केले. दिवसभर त्यांच्या या निर्णयाची चर्चा माहोरा सर्कल व पंचक्रोशीत होत असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






