Home बुलढाणा नव्या शैक्षणिक सत्रासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात ! गावागावांत मारताहेत चकरा : पालकांना...

नव्या शैक्षणिक सत्रासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात ! गावागावांत मारताहेत चकरा : पालकांना भेटून प्रवेशासाठी करतायेत विनवणी

125

आशाताई बच्छाव

1000371426.jpg

नव्या शैक्षणिक सत्रासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात ! गावागावांत मारताहेत चकरा : पालकांना भेटून प्रवेशासाठी करतायेत विनवणी
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर बुलढाण

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक जि. प. शाळांनी कात टाकली असली तरी काही शाळा ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा शाळांसाठी शिक्षक आता पहिल्या वर्गात प्रवेश घेण्याचे वय झालेल्या विद्यार्थ्यांच्या शोधात असून काही खासगी शाळांतील शिक्षक त्यासाठी फिरत असल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषद शाळेचा निकाल मे महिन्याच्या १ तारखेला लागला आहे. या शाळेतील विद्यार्थी एका वर्गातून दुसऱ्या वरच्या वर्गात गेलेले आहेत. त्यामुळे खालचा वर्ग रिकामा झालेला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षकांची भटकंती सुरू झाल्याचे चित्र आहे.आपल्या शाळेतील पहिल्या वर्गामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश व्हावा, या हेतूने शिक्षक हे गावोगाव फिरून विद्यार्थ्यांचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिल्हा परिषदेच्याच नव्हे तर काही खासगी शाळांचेही शिक्षक यासाठी फिरत असल्याचे चित्र आहे. अनेक जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या खूप कमी झाली आहे. आपल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, या हेतूने शिक्षक विद्यार्थी शोधत आहेत.
यामध्ये पहिलीच्या वर्गात नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शिक्षक मुलांच्या पालकांच्या घरोघरी जाऊन पालकांना समजावून शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. ग्रामीण भागातील पालकवर्ग मुलांना कॉन्व्हेंटमध्ये पाठवत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा ओस पडल्याच्या स्थितीत दिसत आहेत. मात्र सद्यःस्थितीत जिल्हा परिषद

शाळेनेसुद्धा आपला शिक्षण देण्याचा मार्ग वळविल्याने आता त्या शाळेमध्ये मुलांसह पालकांना प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जि. प. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची भरती असल्याने आता त्या शाळेतील शाळा-पालक समिती विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्नरत आहे

Previous articleशेतकरी लागले पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला…
Next articleमाहोरा येथील मतदान शांततेत  माहोरा येथील नवरदेव स्वप्निल खराट यांनी बजावला मतदानाचा हक्क
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.