Home जालना माहोरा येथील मतदान शांततेत  माहोरा येथील नवरदेव स्वप्निल खराट यांनी बजावला मतदानाचा...

माहोरा येथील मतदान शांततेत  माहोरा येथील नवरदेव स्वप्निल खराट यांनी बजावला मतदानाचा हक्क

469

आशाताई बच्छाव

1000371428.jpg

माहोरा येथील मतदान शांततेत
माहोरा येथील नवरदेव स्वप्निल खराट यांनी बजावला मतदानाचा हक्क
माहोरा प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की, माहोरा येथे दिनाक 13 मे2024 रोजी सकाळी 7 वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली. मतदानाला मतदारांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. माहोरा येथील मतदान केंद्रावर माहोरा येथील नवरदेव स्वप्नील सुनील खाराट यांनी बांशिग बांधलेले असतांनाही आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे लग्न लागण्यासाठी दुसऱ्या गावी जाणार होते तरी त्यांनी मतदान करूनच जाण्याचा निर्णय घेतला . वऱ्हाड मंडळी यांनी सुध्दा त्यांच्या या निर्णयाला होकार दिला व त्या नवरदेवाचे अभिनंदन सुध्दा केले. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी लांबच- लांब रांगा लागल्या होत्या तरी पण मतदारांनी सर्वांच्या आगोदर नवरदेव स्वप्निल खराट यांना मतदान करण्यासाठी जाऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्याची सर्व मतदारांनी दखल घेऊन मतदान झाल्या नंतर उपस्थित मतदारांनी त्यांचे कौतुक केले. दिवसभर त्यांच्या या निर्णयाची चर्चा माहोरा सर्कल व पंचक्रोशीत होत असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleनव्या शैक्षणिक सत्रासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात ! गावागावांत मारताहेत चकरा : पालकांना भेटून प्रवेशासाठी करतायेत विनवणी
Next articleपोलीस नक्षल चकमक: तीन नक्षल्यांचा खात्मा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.