आशाताई बच्छाव
पोलीस नक्षल चकमक: तीन नक्षल्यांचा खात्मा
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ): भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवडील जंगल परिसरात झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून हि संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पेरमिली दलम चे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात सध्या सुरू असलेल्या TCOC कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती 13 मे रोजी सकाळी पोलीस विभागाला मिळाली.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अप्पर अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी 60 च्या दोन तुकड्या तातडीने परिसरात शोधण्यासाठी दाखल करण्यात आल्या. पथके परिसरात शोध मोहीम राबवित असतांना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला पोलिसांनीही नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसरातील झडती घेतल्या नंतर 1पूरूष आणी दोन महिला नक्षलवादांचे मृतदेह आढळले आहेत.गोळीबाराच्या ठिकाणाहून तिन 1एके 47,1 कार्बाइन आणी 1 इन्सास रायफल, अशी तीन स्वयंचलित शस्त्रे तसेच नक्षल साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
यातील एका मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह पेरमिली दलम चा प्रभारी आणि डिव्हिसिएम कंमाडर वासू याचा असल्याचे पोलीस विभागाने म्हटले आहे.






