आशाताई बच्छाव
शेतकरी कन्येच्या लग्नासाठी समृद्धीचे साखररुपी कन्यादान
सतीश घाटगे यांच्याकडून एक क्विंटल साखर घरपोच
————-
अंबड/ जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): समृद्धी साखर कारखान्यातर्फे भार्डी येथीलशेतकरी रशिद महेमुद शेख यांच्या मुलीच्या लग्नासाठी समृद्धी कारखान्यामार्फत शुभमंगल कन्यादान योजने अंतर्गत एक क्विंटल साखर घरपोच देण्यात आली.
समृद्धी साखर कारखाना ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एक क्विंटल साखर मोफत घापोच करतो. अशा प्रकारची अभिनव योजना राबवणारा समृद्धी कारखाना महाराष्ट्रातील पहिला खाजगी कारखाना आहे. भार्डी येथल शेतकरी रशिद महेमुद शेख
यांच्या मुलीचा विवाह ठरताच कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी कारखान्यामार्फत एक क्विंटल साखर पोहोच केली. यावेळी रशिद महेमुद शेख यांनी समृद्धी परिवाराचे आभार मानले. याप्रसंगी जावेद शेख, रोहिदास मिसाळ, विजय नखाते , सरपंच नवनाथ डोईफोडे, उपसरपंच नासेर भाई, पांडुरंग कुढेकर, तैमूर शेख , हारून शेख उपस्थित होते.






