आशाताई बच्छाव
मुलांनी लावले ८० वर्षे वडिलांचे लग्न: प्रदीर्घ क्षण शोधा नंतर सापडली ६५ वर्षीय वधू, पत्नीच्या मृत्यूनंतर वृद्ध नवरदेवाला वाटत होते एकटे.
__________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती जिल्ह्यात रहिमापूर येथील एका ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा त्यांच्याच मुलांनी हात पिवळे केल्याचे अनोखी घटना घडली ८मे रोजी हे लग्न पार पडले. त्यात वृद्ध वधू वर पक्षाच्या दोन्ही बाजूकडील मंडळींनी हिरारीने सहभाग घेतला .८०वर्षीय विठ्ठल खंडारे नामक उद्याच्या पत्नीनचे३ वर्षापूर्वी निधान झाले होते. यामुळे त्यांना एकटे वाटत होते. त्यामुळे त्याने आपल्या लग्नाचा हट्ट धरला. त्यामुळे त्यांच्या मुलांनी व नातवांनी त्यांचे लग्न लावून देण्याचा चंग बांधला. यासाठी त्यांनी वधू संशोधन सुरू केले. पण ८० वर्षाच्या वृद्धाला नवरी शोधावी तरी कशी हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता? असा एकशे प्रश्न त्यांच्यापुढे असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्वच अडचणीवर मार्ग शोधत अखेर एका ६५ भारतीय वधूचा शोध घेतला आणि विठ्ठल खंडारे यांचे थाटामाटात लग्न लावून दिले. या लग्नात विठ्ठलाच्या मुला मुलीसह सुना व नातवांनी मनसोक्त डान्स केला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथील ८० वर्षीय विठ्ठल खंडारे यांच्या पत्नी तीन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. विठ्ठल खंडारे यांना ४ मुले व मुली व नातवंडे आहेत. त्यांना या उत्तराला वयात एकटी वाटत हा एकांत वास सहन होत नसल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाकडे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रारंभी त्यांच्या प्रथम मुलांनी त्यांच्या या इच्छेला विरोध केला
पण विठ्ठलाच्या लग्नाचा हट्ट पाहता त्यांनी नमती घेतले. त्यांनी नवरी शोधण्याचे काम हाती घेतले पण ८० वर्षाच्या वरासाठी वधू शोधणे सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे त्यांनी वर आधारित सर बायोडेटा तयार केला. नवरदेवाचे वय पाहता त्यांच्यासाठी तशीच वधू मिळणे अवघड होते. पण त्यानंतरही विठ्ठल रावांच्या मुलांनी त्यांच्यासाठी वधू शोधून सुरू केले. आखरीस त्यांना अकोल्याच्या अकोट येथील एका ६६ वर्ष वधू सापडली. त्यांनी तिच्याशी सोयरी जुडवली. त्यानंतर बुधवारी विठ्ठलराव खंडारे यांच्या चिंचोली रहिमापूर येथे लग्न लावून दिले यावेळी निघालेल्या वरातीत विठ्ठलाच्या सर्वच मुले व मुली नसताना दिसून आले. हे पाहून त्यांच्या नातेवाकांनाही ठेका धरला. यावेळी चिंचोली रहिमापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले ८०वर्षीय वृद्धाचे६५ वर्षीय उधोशी झालेल्या या लग्नाचे उद्या पंचक्रोशी चर्चा रंगली आहे.






