Home भंडारा पहेला ते चिखलपहेला रस्त्याची दयनीय अवस्था, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता रस्त्याची...

पहेला ते चिखलपहेला रस्त्याची दयनीय अवस्था, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता रस्त्याची त्वरित दुरुस्ती करा- सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे

120

आशाताई बच्छाव

1000356348.jpg

पहेला ते चिखलपहेला रस्त्याची दयनीय अवस्था, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता
रस्त्याची त्वरित दुरुस्ती करा- सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे

भंडारा तालुक्यातील पहेला ते चिखलपहेला हे दोन किलोमीटरचे अंतर असून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे कळत नाही .या रस्त्याने समोरून वाहन आला तर साधी टू व्हीलर गाडी , सायकल,सुद्धा चालवणे धोक्याचे आहे .आता नुकत्याच झालेल्या बारिश ने रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्ड्यात पाणी साचले असून संबंधित विभागाने त्याचप्रमाणे जनप्रतिनिधी यांनी या रस्त्याकडे तात्काळ लक्ष घालून पहेला ते चिखल पहेला हे दोन किलोमीटर अंतर असलेले रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही साईडला असलेला कचरा साफ करावा चिखलपहेला येथे जाताना ठिकठिकाणी वळण असून समोरून येणारे फोर व्हीलर वाहन दिसत नाही. त्यामुळे कळत नकळत धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते. आज दिनांक 9 मे 2024 ला त्याच्या फटका टू व्हीलर चालकांना बसला.त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून नागरिकांना येण्या-जाण्याकरिता रस्ता सोईस्कर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.

Previous articleबीड जिल्ह्यातील ६२२ मतदारांनी पोस्टल मतदान केले
Next articleविरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.