Home जालना लोकसभा निवडणूक : काँग्रेस पक्षातर्फे सहा निरीक्षकांची नियुक्ती

लोकसभा निवडणूक : काँग्रेस पक्षातर्फे सहा निरीक्षकांची नियुक्ती

123

आशाताई बच्छाव

1000346007.jpg

लोकसभा निवडणूक : काँग्रेस पक्षातर्फे सहा निरीक्षकांची नियुक्ती
—————————————     जालना(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)जालना लोकसभा निवडणुकीचे नियोजन आणि महाविकास (इंडिया) आघाडीतील पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी जालना लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या सुचनेनुसार व पक्षाचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.त्यात जालना विधानसभा मतदार संघासाठी
आ.मोहनराव हंबर्डे यांची नियुक्ती करण्यात आली असून बदनापूर माधवराव पवार,भोकरदन आ.धिरज देशमुख,सिल्लोड तुकाराम रेंगे पाटील,फुलंब्री बाळासाहेब देशमुख,पैठण आ.सुरेश वरपुडकर यांचा समावेश आहे.विधानसभा निरीक्षकांनी संबंधित विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून जिल्हाध्यक्ष,विधानसभा क्षेत्रातील प्रदेश पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी व महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी यांची बैठक घेऊन इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे निवडणुकीत विजयी होतील या दृष्टीने योग्य ते नियोजन करावे असे या पत्रकात प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी स्पष्ट केले आहे.