Home जालना भैय्यासाहेब साळवे, संतोष आव्हाड बसपातून पदमुक्त

भैय्यासाहेब साळवे, संतोष आव्हाड बसपातून पदमुक्त

119

आशाताई बच्छाव

1000332607.jpg

भैय्यासाहेब साळवे, संतोष आव्हाड बसपातून पदमुक्त
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः बहुजन समाज पार्टीचे जालना विधानसभा अध्यक्ष भैय्यासाहेब साळवे व मातंग भाईचारा शहराध्यक्ष संतोष आव्हाड यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना पदमुक्त करण्यात येत असल्याचे बहुजन समाज पार्टीचे जालना जिल्हाध्यक्ष रमेश डी. उबाळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, बहुजन समाज पार्टीचे जालना विधानसभा अध्यक्ष भैय्यासाहेब साळवे व मातंग भाईचारा शहराध्यक्ष संतोष आव्हाड यांना वारंवार सांगुनही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आदेश न पाळणे, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सोशल मिडियावर बदनामी करणे, बेशिस्त वागणे या व अन्य कारणांमुळे साळवे आणि आव्हाड या दोघांनाही बहुजन समाज पार्टीतून पदमुक्त करण्यात येत आहे. त्यांच्याशी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपर्कात राहू नये असेही जिल्हाध्यक्ष उबाळे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
——

Previous articleविकासाच्या नावाखाली थापा मारणाऱ्यांना सामान्य जनता घरचा रस्ता दाखवणार ———-
Next articleश्रीमती जे.आर गुंजाळ विद्यालयातील ग्रंथपाल दिलीप घोगरे यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.