Home वाशिम वाशीम जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे २६ एप्रिल रोजी मतदान होणार

वाशीम जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे २६ एप्रिल रोजी मतदान होणार

106

Yuva maratha news

1000312572.jpg

वाशीम , प्रतिनिधी निखिल धुत -वाशीम जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान करून आलेल्या मतदारांना २६, २७ आणि २८ एप्रिल रोजी हॉटेल ईव्हेंटो, दानिश एम्पायर आणि मनीप्रभा येथे १० टक्के सवलत तसेच एच टू एम सिनेमागृह येथे ५० रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे
तसेच भारतीय वैद्यक परिषद (Indian Medical Association) यांनी एकमताने निर्णय “आहे’ घेतल्यानुसार वाशिम जिल्हयातील IMA संघटना वाशिमशी सलंग्न सदस्य डॉक्टर यांच्याकडून तपासणी शूल्कामध्ये रूग्णास दिनांक 27 आणि 28 एप्रिल 2024 रोजी 50% सवलत देण्यात येईल.

अशाच प्रकारे जिल्ह्यातील विविध आस्थापनांनी त्यांच्याकडील कामगारांना मतदान केल्यास पगारी रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे मतदान करून आलेल्या मतदारांना २६, २७ आणि २८ एप्रिल रोजी ओपीडी तपासणी मध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मतदानाची टक्केवारी वाढावी, शेवटच्या मतदाराने आपला हक्क बजावा या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि अनेक संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून मतदान करून घेणे तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील प्रतिष्ठित आस्थापनांकडून मतदानास प्रोत्साहन देण्यासाठी केल्या जाणा-या प्रयत्नांना नगरिकांनी मोठया उत्साहात प्रतिसाद देत मतदान करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleमाहोरा येथे रामनवमी निमित्त हरी कीर्तन संपन्न
Next article_बुलढाणा लोकसभा मतदानासाठी यंत्रणा सज्ज”_
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.