Home बीड पोलीस अधीक्षकांचा फोटो आणि नाव वापरून सायबर भामट्याने घातला धुमाकूळ

पोलीस अधीक्षकांचा फोटो आणि नाव वापरून सायबर भामट्याने घातला धुमाकूळ

120

आशाताई बच्छाव

1000302534.jpg

पोलीस अधीक्षकांचा फोटो आणि नाव वापरून सायबर भामट्याने घातला धुमाकूळ

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड – काळ बदलला तसा उद्योग उलट सुलट उद्योग करणाऱ्या भामट्यांच्या कृतीतही बदल झाला आहे. यात सर्वात जास्त कुणी धुमाकूळ घातला असेल तर तो ऑनलाइन यंत्रणेचा उपयोग करून गंडा घालणाऱ्या भामट्यानी. यातून चक्क बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हेही सुटले नाहीत. त्यांचे नाव आणि फोटो वापरून सायबर भामट्याने धुमाकूळ घातल्याचे लक्षात येताच दस्तूर खुद पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना अशा कोणत्याही ऑनलाईन फसवणुकीला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन करावे लागले आहे. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पोलीस किंवा इतर प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव व फोटो वापरून त्यांच्या फ्रेंड लिस्ट मधील लोकांना मेसेज पाठवला जात आहे. यापूर्वी असे अनेक प्रकार घडले असून याची सायबर पोलीस ठाण्यात नोंदही झालेली आहे. असाच प्रकार शुक्रवारी ही घडला आहे. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा फोटो व नाव वापरून सायबर भामट्यांनी काही लोकांना मेसेज केले आहेत. या मेसेज मधून कुणालाही अद्याप तरी पैसे मागितल्याचे समोर आलेले नसले तरी फोटो व नाव वापरण्याची माहिती स्वतः नंदकुमार ठाकूर यांनी सोशल मीडियावर देत अशा खोट्या अकाउंट पासून सावध राहावे, त्यांना प्रतिसाद देऊ नये असे आवाहन केले आहे. समाजात एकीकडे सर्वसामान्यांच्या मागे लागलेले सायबर भामटे वेगवेगळे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करीत असतात. परंतु आता तर चक्क पोलीस अधीक्षकांचा फोटो व नाव वापरून व्हाट्सअप वरून फसवणूक करण्याचा प्रकार केला जात असल्याचा दस्तुर खुद नंदकुमार ठाकूर यांनी फेसबुक वर पोस्ट टाकल्यानंतर समोर आले आहे.

Previous articleवाहनांच्या एलईडी दिव्यांमुळे अपघाताचा धोका वाढू लागला!
Next articleबीडच्या पांढरवाडी गावात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू ; तीन लाखाचे नुकसान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.