Home बीड लोकशाहीची आदर्श मुल्ये रूजविणारी संस्कृती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीच रूजविली-अ‍ॅड.मनोज संकाये

लोकशाहीची आदर्श मुल्ये रूजविणारी संस्कृती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीच रूजविली-अ‍ॅड.मनोज संकाये

89

आशाताई बच्छाव

1000287750.jpg

लोकशाहीची आदर्श मुल्ये रूजविणारी संस्कृती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीच रूजविली-अ‍ॅड.मनोज संकाये

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: १४ 
सर्व विश्वामध्ये भारतीय संविधान सर्वोत्कृष्ट ठरले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानाच्या माध्यमातून खरी लोकशाही काय असते याचे मुर्तीमंत उदाहरण जगासमोर ठेवले, त्यांनीच आदर्श मुल्ये रूजविणारी संस्कृती रूजविली असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.मनोज संकाये यांनी केले. आज रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी भारतररत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने अ‍ॅड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला आदर्श लोकशाहीचा मुलमंत्र दिला. त्यांना व त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो असे अ‍ॅड.संकाये म्हणाले.
यावेळी राहुल कांदे, शिवा बडे, शिवाजी मुंंडे सर, काशिनाथ सरवदे, सुंदर आव्हाड, अ‍ॅड.बुध्दरत्न उजगरे, प्रशांत कदम, संजय पवार, बालाजी ठोके, गोविंद राठोड, संतोष कांबळे, राम गडदे यांच्यासह तमाम भीमसैनिक, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleकेज येथे झालेल्या अपघातात परळीतील एक महिला ठार
Next articleसंस्कार प्राथमिक शाळा, विद्यानगर विभागात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.