Home जालना आदर्श शिक्षक संपतराव कासोद यांचे 93 व्या वर्षी निधन

आदर्श शिक्षक संपतराव कासोद यांचे 93 व्या वर्षी निधन

175

आशाताई बच्छाव

1000282275.jpg

आदर्श शिक्षक संपतराव कासोद यांचे 93 व्या वर्षी निधन
जिल्हा प्रतिनीधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 13/04/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की,माहोरा येथील आदर्श शिक्षक माजी मुख्याध्यापक कै. संपतराव गोविंदराव कासोद यांचे दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान दुःखत निधन झाले. मृत्यू समई त्यांचे वय 93 वर्ष होते.शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत कडक व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.तसेच शिस्तीच्या बाबतीत सुध्दा शिस्तप्रिय म्हणून जाफराबाद तालुक्यातून व माहोरा परिसरातून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या जाण्याने जाफराबाद तालुक्यातून तसेच माहोरा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना तीन मुले, दोन मुली ,सूना , नातवंड असा मोठा परिवार असून त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले. दिलीप संपतराव कासोद वकील, रवींद्र संपतराव कासोद डॉक्टर, प्रदीप संपतराव कासोद डॉक्टर यांचे ते वडील होते. दुपारी चार वाजता त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा. रावसाहेब पाटील दानवे, आमदार संतोष पाटील दानवे, माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे, पत्रकार तथा अखिल भारतीय युवा मराठा महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष श्री मुरलीधर डहाके यांच्यासह शैक्षणिक , वैद्यकीय, सामाजिक, सर्व राजकीय, पत्रकार, मित्र व नातेवाईक बाबांना अंत्यसंस्कार साठी व शेवटचा निरोप देण्यासाठी उपास्थित होते. बाबाच्या जाण्याने जाफराबाद व माहोरा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleसंग्रामपूर भाजपा वैद्यकीय आघाडी संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी डॉ.अमोल धुर्डे
Next articleकामगार नेते मनोज कोलते पाटील जालना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.