Home वाशिम श्री बाकलीवाल विद्यालयाचा माजी विद्यार्थी झाला उपशिक्षणाधिकारी

श्री बाकलीवाल विद्यालयाचा माजी विद्यार्थी झाला उपशिक्षणाधिकारी

255

आशाताई बच्छाव

IMG_20240327_065452.jpg

श्री बाकलीवाल विद्यालयाचा माजी विद्यार्थी झाला उपशिक्षणाधिकारी
शाळेचा केला नावलौकीक : शाळा समितीच्या वतीने सत्कार
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- येथील श्री बाकलीवाल विद्यालयाचा माजी विद्यार्थी धिरज सखाराम पतंग याने २०२२ मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षेतून दैदिप्यमान यश मिळवून उपशिक्षणाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. यापुर्वी धिरजने मंत्रालय लिपीक, कर सहाय्यक, तलाठी तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात दुय्यम निबंधक श्रेणी १ मुद्रांक निरिक्षक म्हणूनही चांगल्या गुणांनी परिक्षा उत्तीर्ण केली होती. धिरज हा स्थानिक शुक्रवारपेठ भागातील रहिवासी आहे. त्याने श्री बाकलीवाल विद्यालयातून मराठी माध्यमातून इयत्ता १० वी पर्यतचे शिक्षण घेतले होते. शाळेच्या माजी विद्यार्थ्याने मिळविलेल्या या नेत्रदिपक यशाबद्दल श्री बाकलीवाल शाळा समितीच्या वतीने धिरज पतंगे याचा सत्कार केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक सुनिल दंभिवाल आदींनी धिरजचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. घरची परिस्थिती अत्यंत साधारण असतांनाही धिरजने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्वत्र कौतूकाचा वर्षाव होत आहे.

Previous articleअकोला,बुलढाणा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांना घाबरण्याची गरज नाही – शेगाव तहसीलदार बाजड
Next articleसुख दुःखाचे साथीदार (आयुष्यातील घडामोडीचा रोखठोक आढावा)!       
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.