Home जालना माहोरा येथे पाण्याची समस्या दूर होणार ? “अखेर टँकर झाले सुरू’

माहोरा येथे पाण्याची समस्या दूर होणार ? “अखेर टँकर झाले सुरू’

167

आशाताई बच्छाव

IMG_20240321_071542.jpg

माहोरा येथे पाण्याची समस्या दूर होणार ? “अखेर टँकर झाले सुरू’
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख

सविस्तर वृत्त असे की, माहोरा येथे पाणी टंचाईची खूप वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत गावकऱ्यांना पाणी टंचाई पासून दूर करण्यासाठी टँकर ने पाणी पुरवठा करणे हाच एकमेव पर्याय ग्रामपंचायत पुढे होता . सरपंच गजानन पाटील लहाने व ग्रामसेवक धुमाळ साहेब यांच्याकडे गावकऱ्यांच्या पाण्यासाठीच्या खूप तक्रारी होत्या की, आपल्याला माहोरा येथे पाण्याची समस्या दूर करण्यासाठी टँकर सुरू करून पाणी पुरवावे. त्यांची दखल घेऊन सरपंच गजानन पाटील लहाने आणि ग्रावसेवक धुमाळ साहेब यांनी शासन दरबारी प्रयत्न करुन पाण्याचे टँकर मंजुर करून घेतले. त्यामुळे गावातून सरपंच व ग्रामसेवक धुमाळ यांचे माहोरा येथील गावकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे. टँकर ने आणलेले पाणी अगोदर पाणी पुरवठा टाकी मध्ये टाकले जाते. त्यानंतर गावांमध्ये पाणी सोडले जाते. पाणी सोडत असतानां गावातील सर्व नागरिकांना व गावातील प्रत्येक वार्डात सर्वांना पाणी मिळेल अशी व्यवस्था सरपंच व ग्रामसेवक यांनी करावी अशी गावकऱ्यांची इच्छा असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांच्या वतीने आल्या आहेत.

Previous articleकायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे पोलीस निरीक्षकाचे आव्हान.
Next articleगृहिणी (घरातील कामांची जबाबदारी सगळ्यांची)
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.