Home विदर्भ उद्धव ठाकरे यांचा हिंगोली जिल्ह्यात कुटुंब संवाद दौरा वसमत सेनगांव कळमनुरी

उद्धव ठाकरे यांचा हिंगोली जिल्ह्यात कुटुंब संवाद दौरा वसमत सेनगांव कळमनुरी

149

आशाताई बच्छाव

IMG_20240320_123700.jpg

उद्धव ठाकरे यांचा हिंगोली जिल्ह्यात कुटुंब संवाद दौरा वसमत सेनगांव कळमनुरी

आपकी बार भाजपा तडीपार असा नारा घरा घरा पर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे यांच कुटुंब संवाद दौऱ्यानिमित्त पदाधिकाऱ्यांना आव्हान
~~~~~~~~~~~~~~~`
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख

 

सविस्तर वृत्त असे की, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कुटुंब संवाद दौरा हिंगोली जिल्ह्यांमध्ये दिनांक 18 मार्च जिल्ह्यात वसमत, सेनगाव, कळमनुरी या ठिकाणी कुटुंब संवाद दौऱ्यानिमित्त बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले भाजपा हा घरफोडी पक्ष आहे. त्यांना घर फोडण्याचा लायसन द्या असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं देशात आता मोदी गॅरंटी चालणार नाही आता अच्छे दिन नाही तर सच्चे दिन आले आहेत. भाजपा ही खंडणी गोळा करणारी टोळी बनली आहे त्यामुळे यांना आता हद्दपार करा अस आव्हान उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद दौऱ्यानिमित्त केले ते पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला शेतीमालाला हमीभाव देतो मनाले शेतकऱ्यांना फसवण्याचं काम मोदी यांनी केले आणि करत आहेत शेतमालाला भाव तर मिळालाच नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी मोदींच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये कारण ते वेळोवेळी लबाड आणि खोटं बोलतात आता यांच्या भूलथापना बळी पडू नका असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले

सेनगाव येथील व्हि.के. मंगल कार्यालयातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांना कुटुंब संवाद दौऱ्यानिमित्त संजय राऊत म्हणाले उद्धव साहेब आपण देशाचा आवाज आहात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये उद्धवजींचे कौतुक केले. गद्दारांना धडा शिकवण्याची हिम्मत कोणामध्ये असेल तर शिवसेनेमध्ये आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातिल शिवसेना गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हिंगोलीतील शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली आहे कुटुंब संवाद दौऱ्यानिमित्त संजय राऊत बोलत होते या कुटुंब संवाद दौऱ्यात,

*सेनगाव येथील मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवून घोषणा देत मनाले जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठलीही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांची सभा होऊ देणार नाही असा पवित्रा घेत एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा दिल्या पोलिसांनी मराठा समाज बांधवातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले*

या कुटुंबास संवाद दौऱ्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले होते या कार्यक्रमाची उपस्थित संजय राऊत संपर्कप्रमुख बबनराव थोरात नागेश पाटील आष्टीकर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा मिलिंद नार्वेकर माजी खासदार सुभाष वानखेडे राहुल पाटील आमदार परभणी जिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख राजेश पाटील गोरेगावकर रूपालीताई पाटील गोरेगावकर तालुकाप्रमुख संतोष देवकर यासह महिला व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleपरभणीत बस पुलावरून खाली कोसळली; २५ प्रवासी जखमी
Next articleलोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.