Home भंडारा युवकाने केला आई-मुलीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला.

युवकाने केला आई-मुलीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला.

115

आशाताई बच्छाव

IMG_20240302_080700.jpg

युवकाने केला आई-मुलीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला.

तुमसर शहरातील दुर्गा नगरातील घटना.

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)-घरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अचानक घरात प्रवेश करुन धारदार शस्त्राने महिलेच्या मानेवर व अल्पवयीन मुलीच्या पायावर जोरदार हल्ला चढवित प्राणघातक हल्ला केल्याची घटना. शुक्रवारी दुपारी दिड वाजता दरम्यान तुमसर शहरातील दुर्गा नगरांत घडली.सिमा धनंजय उके (४५) व १७ वर्षीय मुलगी रा. दुर्गा नगर तुमसर असे प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या आई-लेकीचे नाव आहे.विश्वास चंद्रिकापुरे (२५) रा.कुभांरे नगर तुमसर असे फरार आरोपी युवकाचे नाव आहे.घटनेच्या दिवशी दुपारी दिड वाजता दरम्यान स्वत:च्या घरी आई व मुलगी घरी बसली असता़ना अचानक आरोपीने जखमींच्या घरी प्रवेश करून धारदार शस्त्राने महिलेच्या मानेवर व अल्पवयीन मुलींच्या पायावर चाकूने हल्ला चढविला असता आई व मुलीने घरा बाहेर पळ काढत आरडा ओरड केली.व लगतच्या घरी जात आपला जिव वाचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरीकांची गर्दी झाली होती. व जखमींना भंडारा येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सध्या आईवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.तर अल्पवयीन मुलीला सुट्टी देण्यात आली.अशी माहिती आहे.जखमीं सिमा उके ची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. प्राणघातक हल्ला करणारा आरोपी विश्वास चंद्रिकापुरे हा हल्ला करुन घटनास्थळावरुन पसार झाला आहे. आरोपी हा जखमींच्या घरी दुचाकीने आला होता अशी माहिती आहे.तर हल्ला करुन स्वत: च्या घरी जाऊन एका चार चाकी ओमीनी वाहनाने पसार झाल्याचे वृत्त आहे. वृत्त लिहोस्तर आरोपी युवकाला अटक करण्यात आली नव्हती.आरोपीच्या मागावर तुमसर पोलीस रवाना झाले आहेत.
सदर हल्ला प्रेमप्रकरणातून झाला असल्याच्या चर्चा आहेत.
सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव, पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुधे,गिते,जयसिंग लिल्हारे,व तुमसर पोलीस करीत आहेत.

Previous articleसाकोली येथे संत नरहरी सोनार पुण्यतिथी साजरी
Next articleदेवू तुतारीची ललकारी, घेऊ विजयाची भरारी !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.