Home पुणे देवू तुतारीची ललकारी, घेऊ विजयाची भरारी !

देवू तुतारीची ललकारी, घेऊ विजयाची भरारी !

114

आशाताई बच्छाव

IMG_20240302_080950.jpg

देवू तुतारीची ललकारी, घेऊ विजयाची भरारी !           पुणे प्रतिनिधी दिपक कदम 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या खेड-आळंदी, जुन्नर व आंबेगाव विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक निसर्ग कार्यालय, गुलटेकडी, पुणे येथे संपन्न झाली.
या बैठकीत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघाचा आढावा सादर करत पुढील नियोजनासंदर्भात आपापले विचार मांडले. यावेळी आदरणीय शरद पवार साहेबांनी सर्वांना मार्गदर्शन करत आवश्यक सूचना केल्या.
सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सकारात्मक वातावरण व योग्य समन्वय असून आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल हा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी खासदार अमोल कोल्हे व शरद पवार साहेब यांच्या गटातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleयुवकाने केला आई-मुलीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला.
Next articleशिर्डी मतदार संघात आम्ही केवळ मतदान करण्यासाठीच आहोत का? – राजेंद्र वाघमारे यांचा सवाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.