Home भंडारा साकोली येथे संत नरहरी सोनार पुण्यतिथी साजरी

साकोली येथे संत नरहरी सोनार पुण्यतिथी साजरी

91

आशाताई बच्छाव

IMG_20240302_080317.jpg

साकोली येथे संत नरहरी सोनार पुण्यतिथी साजरी

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) संत नरहरी सोनार मुख्य मंदिर नवीन बस स्टॉप समोर साकोली येथे दिनांक 27 28 फेब्रुवारीला भारतीय सुवर्णकार समाज शाखा साकोली च्या वतीने संत शिरोमणी नरहरी सोनार यांची पुण्यतिथी तसेच मंदिरात संत नरहरी सोनार ,विठ्ठल रखुमाई व शिवलिंगचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आले व सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉ हेमकृष्णा कापगते, माजी आमदार बाळाभाऊ काशिवार ,भाजपा तालुका अध्यक्ष अमोल हलमारे ,काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष अशोक कापगते ,डॉ शकुंतला कापगते, दिलीप मासुरकर ,नितीन खेडीकर, जि प सदस्या वनिता डोये, जि प सदस्या माहेश्वरी नेवारे ,माजी नगराध्यक्षा धनवंता राउत,माजी नगरसेविका मीना लांजेवार ,अमोल टेंभुर्णे, प्रभाकर सपाटे व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या दोन दिवसीय कार्यक्रमाप्रसंगी शोभायात्रा, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम ,महिलांसाठी हळदीकुंकू ,कीर्तन ,भजन, काला व महाप्रसाद देण्यात आला यावेळी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा, समाजसेवकांचा व मूर्तिदात्यांच्या सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला .या कार्यक्रमात सर्व सोनार समाज बांधवांनी सहकार्य केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष व्यंकटेश येवले ,उपाध्यक्ष दिलीप निनावे, सचिव मयूर गजापुरे ,कोषाध्यक्ष प्रकाश रोकडे ,संयोजक किशोर पोगडे, राजेश ढोमणे, अजय भजे, गुणवंत गजापुरे, अशोक भरणे, चंद्रशेखर पोगडे, सदाशिव मस्के ,अमेय डुंबरे,भास्कर येवले, चुळाराम येवले, सुरज डुंबरे, हरीश पोगडे ,दिनेश गजापुरे महिला अध्यक्ष भारती गजापुरे, उपाध्यक्ष रेखा गजापुरे, सचिव बबिता भजे, माधुरी ढोमणे, अनिता पोगडे ,मीना येवले, धनश्री पोगडे, अरुणा येवले, सुनीता पोगडे ,भाविका येवले, सुरभी डुंभरे, पुष्पा गजापुरे, भूमिका येवले, वनिता इन्कने, प्रणाली हाडगे व समाजातील अनेक महिलांनी व पुरुषांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश हर्षे यांनी तर आभार व्यंकटेश येवले यांनी मानले.

Previous articleपुणे लोकसभा बूथ प्रमुख व पदाधिकारी संमेलन संपन्न !
Next articleयुवकाने केला आई-मुलीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.