आशाताई बच्छाव
सहकार बँक कॉलनीत आज हभप महंत बलदेवानंद महाराज गिरी यांचे किर्तन
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): येथील सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प. पू. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा व विजय ग्रंथ पारायण सोहळ्यास कालपासून प्रारंभ झाला असून बुधवारी हभप श्री, महंत बलदेवानंद महाराज गिरी (गोरखनाथ आश्रम सोमनाथ) यांचे किर्तन होणार आहे. दरम्यान, भागवत कथेचे पुष्प गुंफतांना राहुल महाराज जोशी यांनी आजच्या पहिल्याच दिवशी उपस्थित श्रोत्यांचे कान टोचून त्यांना चांगले वागण्याचा आणि बोलण्याचा सल्ला दिला. तर उद्या गुरुवारी हभप श्री. राजेंद्र महाराज वाघमारे (गोंदीकर), शुक्रवारी हभप श्री. पाडुरंग महाराज डिग्रसकर (सेलू) आणि रविवारी हभप श्री. उध्दव महाराज राऊत (आळंदी) यांचे हरी किर्तन होणार आहे. तर सोमवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 8.30 ते 12 पालखी मिरवणूक (दिंडी) सोहळा तर 12 ते 2 या दरम्यान हभप श्री. संत भगवान महाराज आनंदगडकर यांचे काल्याचे किर्तन होणार असून श्री. गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा हा रविवार दि. 3 मार्च 2024 रोजी सकाळी 8.30 ते 10.30 यावेळेत महाभिेषेक तर दुपारी 12 वाजता श्री च्या प्रगट दिनाची महाआरती होणार आहे.यानिमित्त दररोज सकाळी 4 ते 6 काकडा भजन, 7ते 8 विष्णूसहस्त्र नाम, 8 ते 9 श्री गजानन विजय ग्रंथ पारायण, 10 ते 11 गाथा भजन, 1 ते 5 श्रीमद् भागवत कथा तर सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 यावेळेत हरिकिर्तन होणार आहे. श्री जगानन विजय ग्रंथ पारायणाचे व्यासपीठ हभप श्री आत्माराज महाराज बिडवे हे सांभाळत आहेत. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गजानन महाराज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आर्दड आणि सचिव श्री. सपंतराव पाटील व समस्त विश्वस्तांनी केले आहे.
—————————————————