Home भंडारा संकेत भोसले( भिवंडी) मारहाण हत्या प्रकरणी दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षा द्या –...

संकेत भोसले( भिवंडी) मारहाण हत्या प्रकरणी दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षा द्या – भीम आर्मी

101

आशाताई बच्छाव

IMG_20240226_203407.jpg

संकेत भोसले( भिवंडी) मारहाण हत्या प्रकरणी दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षा द्या – भीम आर्मी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) संकेत भोसले भिवंडी यांना 14 फरवरी 2024 ला मारहाण करून निघून हत्या केल्याप्रकरणी दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी करता आज दिनांक 26 फरवरी 2024 ला भंडारा जिल्हाधिकारी यांना भंडारा जिल्हा भीम आर्मीच्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की संकेत भोसले भिवंडी यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली त्याचा अमानुष छळ करण्यात आला त्यातच त्याचा मृत्यू झाला यातील मुख्य आरोपी सत्ताधारी शिंदे गटाचा उपशहर प्रमुख कैलास धोत्रे असल्याचे बोलले जाते .सत्तेच्या जोरावर संपूर्ण राज्यात दलित जनतेवर अत्याचार केले जात आहे . मात्र पोलीस यंत्रणा व प्रशासन प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात असून आरोपीला अभय देण्याचा प्रयत्न करीत आहेत .सदर प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालूवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भंडारा जिल्ह्या भीम आर्मीच्या वतीने महामहीम राष्ट्रपती यांना करण्यात आलेली आहे .निवेदन देताना जिल्हाध्यक्ष विक्रांत भालाधरे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर सुखदेवे ,रुपेश गोस्वामी जिल्हा संघटक ,अश्विन गोस्वामी ग्रामीण भंडारा तालुका अध्यक्ष , नेहाल गजभिये ग्रामीण तालुका उपाध्यक्ष ,सौरभ गडपायले शाखाध्यक्ष कारधा, व इतर कार्यकर्त यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleआसोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटाचे प्रशिक्षण
Next articleस्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट तांदळाचे वाटप  चौकशीची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.