आशाताई बच्छाव
शतकवीर रक्तदाता सुरेश रेवणकर यांचे रक्तदानाच महान कार्य ऐकून अनेकांनी केले रक्तदान
युवा मराठा न्यूज
सविता तावरे-मुंबई स्पेशल रीपोर्टर
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी निमित्त स्वातंत्रवीर विनायक दामोदर स्मारक समिती मुलुंड च्या वतीने , रक्तदानाचे महायज्ञ 25 फेब्रुवरी 2024 रोजी चित्पावन ब्राह्मण सेवा हॉल महात्मा फुले रोड मुलुंड पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते ह्या वेळी डॉ. अध्यक्ष विकास महात्मे माझी खासदार, उदय गोखले, (कार्यक्रम प्रमुख), राजेश गोडबोले, चित्पावन ब्राह्मण सेवा विश्वस्त, राजेश जोशी हे उपस्थित होते, सुरेश प्रभाकर रेवणकर यांनी केलेल्या एकूण 158 वेळा 110 वेळा रक्तदान आणि 48 वेळा प्लेटलेट्स दान व सामाजिक कार्याचे उल्लेख आवर्जून संस्थेचे पदाधिकारी सौ.अस्मिता उदय गोखले ताई ने त्यांचा सन्मान केला. रक्तदान ह्या कार्यक्रम दरम्यान बऱ्याच युवा आणि वयस्कर रक्तदात्यानी भाग घेतले होता एकूण 83 रक्तदात्यांनी रक्तदान केले, सर्वात महत्वाचे उदय गोखले आणि अस्मिता उदय गोखले ह्यांनी एकत्र रक्तदान केले, आणि एक वेगळे आदर्श ठेवले,आणि स्वेच्छेने रक्तदान करण्याऱ्या पैकी एक रक्तदाती रिद्धी संजय कदम कॉलेज मध्ये शिकणारी विद्यार्थिनी जोगेश्वरी वरून मुलुंड प्रवास करून आली होती तिने सुद्धा आपल पाहिले रक्तदान केले ती आपल्या मामी सोबत आली होती आपल्या छोट्या भावाला घेवून सहज कार्यक्रमाला, आणि रेवणकर यासारख्या व्यक्ति कडून प्रेरणा घेऊन रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ते जेव्हा पाहतात तेव्हा आपल्या जीवनाचा उद्देश, एक स्वप्न (प्रत्येक घरा घरात रक्त दाता तयार करण्याचे ) एक दिवस नक्की पूर्ण होईल असे रेवणकर यांना वाटते. आणि विनायक दामोदर सावरकर सारख्या एखाद्या महा मानवाचे पुण्यतिथी फक्त बॅनर लावून साजरे करण्यापेक्षा रक्तदान सारखे जीवन दान देण्याचे कार्य करणारे स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समितीचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी सर्वांना मानाचा मुजरा.