Home बीड परळीत ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी रस्ता मोकळा करून द्या असे आंदोलकांना आव्हान...

परळीत ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी रस्ता मोकळा करून द्या असे आंदोलकांना आव्हान – मनोज जरांगे

130

आशाताई बच्छाव

IMG_20240224_072836.jpg

परळीत ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी रस्ता मोकळा करून द्या असे आंदोलकांना आव्हान – मनोज जरांगे

बीड/परळी दि:२३  बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे दि: २५ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या ब्राह्मण ऐक्य परिषद कार्यक्रमास विविध तालुक्यातून, जिल्ह्यातून सर्व महाराष्ट्रतील ब्राह्मण समाज बांधव या कार्यक्रमास येणार आहेत त्यातच मराठा समाज बांधवांचा रास्ता रोको होणार आहे. पण एक महिन्या आधीपासूनच परळीचे भूषण माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी न.प.परळी यांनी तयारी केली व सर्व महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात प्रत्येक खेड्यापाड्यात समाज बांधवांना आमंत्रणे देण्यात आले आणि मराठा समाज बांधवांचा अचानक रास्ता रोको ठरल्यामुळे सर्वांनी कार्यक्रमाला कसे जायचे हा विचार पडला आहे. यातच बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. व त्यांना परळीत होणाऱ्या ब्राह्मण ऐक्य परिषदेची तयारी झाल्याचे सांगितले. मनोज जरांगे यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर परिषदेच्या दिवशी परिषदेत येणाऱ्या समाज बांधवांना रस्ता मोकळा करून देण्यात येईल असे मनोज जरांगे पाटील यांनी बाजीराव भैया धर्माधिकारी यांना प्रत्यक्ष भेटीमध्ये आश्वासन दिले म्हणून ब्राह्मण एकता परिषदेस जाणाऱ्या समाज बांधवांनी आपापल्या सोबत सदरील पत्रिका व पॉम्प्लेट दाखवून कार्यक्रमास यावे. रास्ता रोको मध्ये कोणालाही अडचण येणार नाही असे आवाहन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.