Home भंडारा ७ ला भंडारा जिल्हा निवड चाचणी स्पर्धा

७ ला भंडारा जिल्हा निवड चाचणी स्पर्धा

154

७ ला भंडारा जिल्हा निवड चाचणी स्पर्धा

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)– महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेनुसार विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा -२०२४ दि. ९ ते ११ फेब्रुवारी २०२४ ला ३८ वी महिला- पुरुष विदर्भ केसरी किताब लढत स्पर्धेचे आयोजन दि. ९ ते ११ फेब्रुवारी २०२४ ला नागपूर जिल्ह्यातील कुही, मांढळ येथे करण्यात आले आहे.
त्याकरिता भंडारा जिल्हा कुस्तीगीर संघाची निवड चाचणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ ला दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. ही निवड चाचणी भंडारा जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास शहारे, सचिव महेश शहारे, कोषाध्यक्ष अशोक बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
त्यात वजन प्रौढ गट ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९ किलो. व विदर्भ केसरी ७५ ते १२५ किलो ग्राम पर्यंत तसेच महिला गट ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ किलो ग्राम व महिला केसरी ६८ ते ७५ किलो ग्राम वजनापर्यंत होणार आहेत.
तरी भंडारा जिल्ह्यातील महिला -पुरूष पेहलवानांनी आपले आधार कार्ड घेऊन वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन भंडारा जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे प्रशिक्षक कुस्ती प्रशिक्षक अशोक बन्सोड व विलास केजरकर यांनी केले आहे.

Previous articleकोण होतीस तू…काय झालीस तू
Next articleरमाबाईंनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष व बलिदान प्रेरणादायी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.