Home जालना रांजणीत ‘नमो चषक’चे दिमाखदार आयोजन आयोजन : ४ फेब्रुवारी थाटात होणार उद्घाटन

रांजणीत ‘नमो चषक’चे दिमाखदार आयोजन आयोजन : ४ फेब्रुवारी थाटात होणार उद्घाटन

94

आशाताई बच्छाव

IMG_20240203_214738.jpg

रांजणीत ‘नमो चषक’चे दिमाखदार आयोजन आयोजन : ४ फेब्रुवारी थाटात होणार उद्घाटन
घनसावंगी/जालना  दिलीप बोंडे ब्युरो चीफ मतदारसंघाअंतर्गत घनसावंगी व जालना तालुक्यातील युवकांसाठी भाजप नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्यावतीने नमो चषक-२०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून,४ फेब्रुवारी सतीश घाटगे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

ग्रामीण भागातील युवा खेळाडूच्या कौशल्य गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना राज्य आणि देश स्तरावर त्यांचे कौशल्य दाखवता यावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जालना व घनसावंगी तालुक्यातील क्रिकेट संघाच्या स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे संयोजक पुरुषोत्तम उढाण,  विठ्ठल देशमुख व राजकुमार उगले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी २० पेक्षा अधिक संघांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेतून विजयी होणाऱ्या संघाची विधानसभा स्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार. ही स्पर्धा समृद्धी साखर कारखान्यांवर होणार आहे.  विजयी संघाना रोख बक्षिस सतीश घाटगे यांच्यावतीने देण्यात येणार आहे. घनसावंगी मतदार संघातील जास्तीत- जास्त  खेळाडू संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव बोबडे,  नमो चषक रांजणी सर्कल प्रमुख राजकुमार उगले,  विठ्ठल देशमुख यांनी केले आहे.

Previous articleहळदी- कुंकू समारंभात वैशालीताई घाटगे यांनी जपला सर्वधर्मसमभाव
Next articleबृहन्मुंबई माध्यमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना आयोजित अध्यक्षीय दिन सत्कार समारोह सोहळा उत्साहात संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.