Home नागपूर लैलेशा भुरे यांना राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार

लैलेशा भुरे यांना राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार

426

आशाताई बच्छाव

IMG_20240202_182008.jpg

लैलेशा भुरे यांना राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार.       नागपूर,(मोहन देशमुख ब्युरो चीफ)

संघर्ष बहुउद्देशिय संस्था नागपूर द्वारा अखिल भारतीय कर्मयोगी संत गाडगेबाबा साहित्य व कला मंचच्या वतीने प्रथम वर्धापन दिन व राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेणा नदीच्या काठावर असलेल्या विश्वशांती वेणावन शांती विहार, हिंगणा येथे २०२४ चा ” राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार” नागपूर येथील लेखिका व कवयित्री लैलेशा भुरे यांना देण्यात आला. राष्ट्रीय युवा प्रबोधनकार श्री.सतिश सोमकुवर,माणिकजी खोब्रागडे,गझलकारा प्रा.सुजाता मेश्राम यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.आजपर्यंत त्यांचे अनेक लेख,कथा, कविता वेगवेगळ्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या आहेत.त्यांना नृत्य,गायन, चित्रकला यांचीही आवड आहे.आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या मासिकात, त्रैमासिकात, दिवाळी अंकात लिखाण केले आहे.या पुरस्कारासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे आहे.

Previous articleप्रा श्याम मानव यांचा 6 फेब्रुवारीला साकोलीत व्याख्यान
Next articleरामपूर येथे आरोग्य शिबीर संपन्न..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.