आशाताई बच्छाव
संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर च्या वतीने हिंगणा येथे प्रथम वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्रातील साहित्यिक ,कवी, सामाजिक कार्यकर्ते यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान
नागपूर( संजीव भांबोरे) संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारा संचालित अखिल भारतीय संत गाडगेबाबा साहित्य व कला मंच नागपूरच्या वतीने प्रथम वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती व नवोदय काव्य संमेलन 28 जानेवारी 2024 ला सकाळी विश्वशांती वेणावन बुद्ध विहार गुमगाव रोड हिंगणा येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा राज्यस्तरीय पुरस्कार व समाजभूषण पुरस्काराचे आयोजन आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले.प्रथम सत्र 11 ते 1.30 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव खोब्रागडे माजी कृषी अधिकारी व ज्येष्ठ कवी व आंबेडकर विचारवंत दत्तवाडी नागपूर उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून दुशिला मेश्राम (दरेकर )गझलकार व मुख्याध्यापिका वानाडोंगरी, सुरेश मानवटकर सामाजिक कार्यकर्ते व संचालक शांती वेणावन बुद्ध विहार नाकाडोंगरी ,कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सतीश सोमकुवर संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर, संयोजक श्रावण गोसावी सचिव संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर यावेळी प्रामुख्याने उपस्थित उपस्थित होते. या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले ,छत्रपती शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांना दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले . व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .दुसरे सत्र दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून नवोदित काव्य संमेलन आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रत्ना यशवंत मनोहरे कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर उपस्थित उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून अस्तीन चौरे कवी व सामाजिक कार्यकर्ते नागपूर ,चंद्रशेखर बांबोळे ज्येष्ठ कवी व आंबेडकरी विचारवंत गडचिरोली ,सविता बनसोड कवियत्री तथा गझलकार वानाडोंगरी, सुभाष मानवटकर ज्येष्ठ कवी व सामाजिक कार्यकर्ते नागपूर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शेंडे नागपूर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सतीश सोमकुवर संघर्ष बहुउद्देशीय समिती नागपूर व अखिल भारतीय कर्मयोगी संत गाडगेबाबा साहित्य व कलामंच नागपूर यांनी केले. कर्मयोगी संत गाडगेबाबा राज्यस्तरीय काव्य भूषण पुरस्कार संदीप शेंडे नागपूर , अस्तीन चौरे नागपूर ,सुजाता मेश्राम (दरेकर) नागपूर, रामराव शेजव कारंजा लाड ,शशांक देशमुख चांदुर बाजार ,मनोहर गजभिये नागपूर ,नरेंद्र गुडगाणे वर्धा , लोपामुद्रा सहारे नागपूर , देविदास हनवते नागपूर सविता बनसोड वानाडोंगरी ,सुभाष मानवटकर वानाडोंगरी, माणिकराव खोब्रागडे नागपूर, वनिता लिचडे पवनी, कर्मयोगी संत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार चंद्रकांत गायकवाड टाकळघाट, चेतन बेले नागपूर ,प्राध्यापक भीमराव गायकवाड नागपूर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे भंडारा ,पत्रकार कुलदीप गंधे भंडारा ,
मकरंद पाटील भुसावळ, सय्यद सलमान यवतमाळ, सदानंद सुर्वे वाशिम ,बाळकृष्ण अमृतकर पुणे ,काव्य गौरव पुरस्काराचे मानकरी लैलशा भुरे नागपूर , अंकिता रामटेके नागपूर ,राहुल श्यामकुवर रामटेक, मधुकर दुपारे चंद्रपूर, कल्पना टेंभुर्णीकर नागपूर ,पायल भुसारे यवतमाळ ,निशिगंधा गव्हाणे नागभीड ,चंद्रशेखर बांबोळे गडचिरोली, रत्ना मनोहरे अमरावती यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले .कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मोहनभाऊ पुडके उपाध्यक्ष संघर्ष बहुउद्देशीय संस्था नागपूर, पंकज भगत कोषाध्यक्ष, महेंद्र सुखदेवे ,धम्मदीप पानतावणे, मंगेश गुजर ,राहुल मेश्राम, अमित बागडे ,दीप्ती शेरके, नम्रता सरदार ,रचना हुमणे अमित मेश्राम आणि सहकार्य केले.






