Home भंडारा भंडारा तालुक्यातील निमगाव येथे प्रजासत्ताक दिनी नृत्यांगना हिंदवी पाटील यांचा कार्यक्रम संपन्न

भंडारा तालुक्यातील निमगाव येथे प्रजासत्ताक दिनी नृत्यांगना हिंदवी पाटील यांचा कार्यक्रम संपन्न

189

आशाताई बच्छाव

IMG_20240128_073445.jpg

भंडारा तालुक्यातील निमगाव येथे प्रजासत्ताक दिनी नृत्यांगना हिंदवी पाटील यांचा कार्यक्रम संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) भंडारा तालुक्यातील पहेला येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील नामवंत नृत्यांगना हिंदवी पाटील यांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन धनंजय तिरपुडे भंडारा जिल्हा काँग्रेस महासचिव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नितेशभाऊ मारवाडे राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष भंडारा होते. दीप प्रज्वलन सामाजिक कार्यकर्ते दीपकभाऊ वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले .प्रमुख अतिथी म्हणून अंकुश वंजारी ,सुभाष आजबले ,सीमा रामटेके ,दयानंद नखाते, पत्रकार संजीव भांबोरे ,पत्रकार कुलदीप गंधे ,पत्रकार अमोल ठवकर ,सरपंच शीलाताई राऊत, पूजाताई ठवकर, नरेंद्र पहाडे ,सरपंच सुहास गोंडाने ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी करण्याकरिता अर्पित मेश्राम ,अमित शिवणकर, प्रवीण धुळसे, अरविंदभाऊ राऊत, अतिश सिडाम, मुन्नाभाऊ चौधरी, गणेश चवळे, रजत शिवनगर ,प्रीतम गंधे विशाल चवळे कुंदन धुळसे जयपाल राऊत, सचिन भोयर, निशिकांत रोडगे ,काशीनंद राऊत ,लोकेश धुळसे, रितिक धुळसे, प्रवीण कुथे, कुणाल खोब्रागडे व इतर असंख्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.