Home जालना माहोरा येथे अयोध्या येथील श्री राम मंदीर स्थापन दीना निमीत्त पालखी सोहळ...

माहोरा येथे अयोध्या येथील श्री राम मंदीर स्थापन दीना निमीत्त पालखी सोहळ संपन्न

311

आशाताई बच्छाव

IMG_20240123_075820.jpg

माहोरा येथे अयोध्या येथील श्री राम मंदीर स्थापन दीना निमीत्त पालखी सोहळा.                                जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ) माहोरा येथील सरपंच गजानन पाटील लहाने आणि गावकरी मंडळी याच्या संयुक्त विद्यमाने श्री राम मंदिर स्थापन दीना निमीत्त पालखी सोहळ्यात आयोजन केले. गावकरी मंडळीनी गावात प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. पालखी सोहळा मारोती मंदिरा समोरुण सुरुवात करण्यात आली पालखी सोबत भजनी मंडळ सुध्दा होती त्यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता त्यांनी भजन , भारूड, फुगडी असे आपल्या कृतीतून सादर केले त्यानंतर प्रत्येक घरासमोर पालखीची महिलांनी श्रीराम मूर्तीचे पूजन करुन दर्शन घेतले . त्यानंतर पालखी शिवाजी चौकात आल्या नंतर शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांनी जय शिवाजी जय शिवराय आणि जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी गावातील आणि परिसरातील मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात महिला सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या… तसेच जाफराबाद पोलीस स्टेशनचे ठाणेदार मदन साहेब आणि त्याचे सहकारी बीट जमादार गावंढे साहेब गवई साहेब यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेऊन शांततेत पालखी सोहळा पार पडला. त्यावेळी माहोरा गावच्या वतीने ठाणेदार मदन साहेब यांचे जेष्ठ नागरिक वामनराव लहाने यांनी हार देउन स्वागत केले.सोबत गावातील वरिष्ठ मंडळी मोठ्या प्रमाणात होती. पालखीचा समारोप राम मंदिर म्हसरूळ रोड माहोरा येथे श्री रामांची आरती घेऊन आणि प्रसादाचे वाटप करून पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

Previous articleअजिंक्य इंग्लिश मिडीयम स्कूलची गाव प्रदक्षिणा
Next articleराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त अवघा मुक्रमाबाद शहर राममय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.