Home भंडारा प्रेम प्रकरणातून तरुणीने केली आत्महत्या दोन दिवसांनी मिळाला विहिरीत मृतदेह लाखांदूर तालुक्यातील...

प्रेम प्रकरणातून तरुणीने केली आत्महत्या दोन दिवसांनी मिळाला विहिरीत मृतदेह लाखांदूर तालुक्यातील तई /बु येथील घटना

174

आशाताई बच्छाव

IMG_20240115_074301.jpg

प्रेम प्रकरणातून तरुणीने केली आत्महत्या

दोन दिवसांनी मिळाला विहिरीत मृतदेह

लाखांदूर तालुक्यातील तई /बु येथील घटना

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )लाखांदूर-तालुक्यातील तई / बु. येथील गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका २० वर्षीय मुलीचे मृतदेह गावातील राम मंदिराच्या विहिरीजवळ 14 जानेवारीला सकाळच्या दरम्यान मृतदेह सापडला. मृतक तरुणीचे नाव प्रांजली शास्त्री कोल्हे रा. तई /बु. येथिल रहिवासी आहे.

प्रेम संबंधातून तरुणीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
मृतक प्रांजली कोल्हे ही १२ जानेवारी रोजी आपल्या आई सोबत झोपली होती. मात्र रात्री दरम्यान अचानक झोपेतून निघुन गेली व घरच्या लोकांनी शोधाशोध केले असता मात्र मुलगी घरी नसल्याने पालांदुर पोलीस स्टेशन ला माहिती दिली. तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी हजर होऊन विहिरीत असलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून
शवविच्छेदनाकरता करीता पाठवण्यात आले.

याबाबत अधिक माहिती घेतली असता गावातील एका तरुणा सोबत प्रेम संबंध असल्याने काही दिवसांपूर्वी तो तरुण मृत पावलेला आहे. पुढिल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे पालांदुर हे करीत आहेत. या कामात गावातील सरपंच हरी भेंडारकर यांनी सुद्धा सहकार्य केले.

Previous articleतालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ चाळीसगाव आयोजीत
Next articleअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेतर्फे राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.