Home जालना राष्ट्रीय क्रीडा सप्ताहास उत्साहात सुरूवात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन

राष्ट्रीय क्रीडा सप्ताहास उत्साहात सुरूवात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन

85

आशाताई बच्छाव

IMG_20231214_065235.jpg

राष्ट्रीय क्रीडा सप्ताहास उत्साहात सुरूवात
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन
जालना/, दिलीप बोंडे- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परीषद जालना यांच्या वतीने दि. 12 ते 18 डिसेंबर 2023 दरम्यान राष्ट्रीय क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सप्ताहाचे उद्धाटन आज रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथील मल्टीपर्पज हॉल येथे सपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेंटबॉल असोसिएशन ऑफ इंडीयाचे निरीक्षक शेख अहेमद तर प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प. निवासी क्रीडा प्रबोधीनीचे संचालक प्रमोद खरात, जिल्हा क्रीडा संघटक शेख चाँद पी.जे., तलवारबाजी असोसिएशनचे सचिव विजय गाडेकर, भरती पुर्व प्रशिक्षक केंद्राचे लक्ष्मीकांत पैजंणे, सुरज जाधव, संदिप जाधव, पवन दांडगे, जितेंद्र पटेकर, प्रशिक्षक शेख ईस्माईल, क्रीडा कार्यालयाचे संतोष प्रसाद यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांची उपस्थित खेळाडुंना शुभेच्छा दिल्या तसेच प्रमोद खरात, शेख चाँद पी.जे., विजय गाडेकर यांची समयानुरूप भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेसी यांनी तर आभार प्रदर्शन राहुल गायके यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेसी यांच्या नेतृत्वाखाली संतोष प्रसाद, शेख हारूण, राहुल गायके, समाधान खुराट यांनी परिश्रम घेतले.

Previous articleमहात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये असलेल्या आरोग्य मित्रांना 25 हजारांची वेतनवाढ करा
Next articleत्या प्रकाराचे समर्थन नाही; मात्र, वैयक्तिक गलीच्च्छ घोषणा अत्यंत गंभीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.