Home जालना त्या प्रकाराचे समर्थन नाही; मात्र, वैयक्तिक गलीच्च्छ घोषणा अत्यंत गंभीर

त्या प्रकाराचे समर्थन नाही; मात्र, वैयक्तिक गलीच्च्छ घोषणा अत्यंत गंभीर

86

आशाताई बच्छाव

IMG_20231214_065556.jpg

…त्या प्रकाराचे समर्थन नाही; मात्र, वैयक्तिक गलीच्च्छ घोषणा अत्यंत गंभीर
निवडणुकीच्या तोंडावर जातीय दंगे पेटविले जाणार नाही याकडे
प्रशासनाने जागरूकपणे बघितले पाहिजे ः डॉ. संजय लाखेपाटील
जालना (दिलीप बोंडे) ः धनगर समाजाचे आरक्षण आणि भाजपा नेते आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथील चप्पलफेक प्रकरण तसेच मराठा राजकीय नेते आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे सामाजिक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबियांच्या विरोधात विकृत, अश्लाघ्य शिवराळीची भाषा व घोषणा करण्यात आली होती त्या अत्यंत गंभीर होत्या. मात्र, भाजपा नेते आ. गोपीचंद पडळकर किंवा कुठल्याही नेत्यांवर झालेल्या चप्पलफेक सारख्या प्रकाराचे मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाज कसलेच समर्थन करत नाही आणि अश्या प्रकारातील खरा आणि कथीत समाजकंटक शोधून प्रशासनाने त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी त्यासाठी सुध्दा सकळ मराठा समाजाची हरकत असण्याचे कारण नाही. तसेच राज्यात सत्तेत असलेला एक राजकीय पक्ष विशेषतः भाजपा आपल्या नेत्यांमार्फत मतांच्या ‘बेगमी’साठी हेतूपुरस्सर असे प्रकार घडवून आणत आहेत आणि ज्यामुळे ठिकठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होत असून वेळीच अश्या घटनांमध्ये हस्तक्षेप केला नाही तर असे प्रकार जश्या-जश्या निवडणूका जवळ येतील तसतसे असे प्रकार वाढत जातील किंवा वाढवले जातील असे दिसते. अंबड येथे नुकत्याच झालेल्या ओबीसी मेळाव्यात आणि भाजपा नेते आ. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ जाहिर केलेल्या बंदमध्ये मराठा समाजाचे  आरक्षण योध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर कौटुंबिक, गलीच्च्छ, वैयक्तिक घोषणा देण्यात आल्या. त्या अत्यंत गंभीर व स्फोटक आहेत. या सर्व प्रकाराच्या क्लिप समाजमाध्यमात फिरत आहेत.

Previous articleराष्ट्रीय क्रीडा सप्ताहास उत्साहात सुरूवात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन
Next articleराज्यात कारागृहामध्ये २ हजार२३७ पदांना मंजुरी, पण भरती केव्हा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.