Home बुलढाणा अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शांताराम पाटील दाणे तर उपसभापती सुरेश...

अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शांताराम पाटील दाणे तर उपसभापती सुरेश तायडे यांची बिनविरोध निवड…

187

आशाताई बच्छाव

IMG_20231211_083550.jpg

अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शांताराम पाटील दाणे तर उपसभापती सुरेश तायडे यांची बिनविरोध निवड…

ज्ञानेश्वर पाटील दांदळे (ब्युरो चीफ बुलढाणा)

संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम पाटील दाणे तर उपसभापती पदी सुरेश तायडे यांची बिनविरोध निवड झाली त्यावेळी आमदार संजय कुटे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनल आज दहा डिसेंबर रोजी संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती पदासाठी निवडणूक होऊन यामध्ये बिनविरोध निवड करण्यात आली 18 संचालकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निवड केली या निवडणुकीत सहकार चे दोन पॅनल होते शेतकरी विकास पॅनल यांची सभापती व उपसभापती पतीदासाठी बिनविरोध निवड निवडणूक अधिकारी महेश कृपलानी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली शेतकरी विकास पॅनलचे 12 संचालक तर शेतकरी सहकार महाविकास आघाडी पॅनलचे सहा संचालक निवडून आले होते.शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शांताराम पाटील दाणे यांची सभापती तर काँग्रेस गटाचे सुरेश तायडे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर दोन्ही पॅनलचे संचालक व राजकीय पदाधिकारी आणि मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी यावेळी भेट देऊन पेढे भरून पुष्पहारणे शुभेच्छा दिल्यात यावेळी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आमदार संजय कुटे सह राजेंद्र ठाकरे व सर्व संचालक सह नवनिर्वाचित सभापती शांताराम पाटील दाणे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

Previous articleरोटरी चा “उडान” प्रकल्प खरोखर विद्यार्थिनींना नवीन पंख देणारा – अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे….
Next articleपत्रकार सन्माननीय संजय बापू देशमुख यांना स्वामी विवेकानंद कार्य गौरव पुरस्कार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.