आशाताई बच्छाव
रोटरी चा “उडान” प्रकल्प खरोखर विद्यार्थिनींना नवीन पंख देणारा – अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे….
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- दि 9 डिसेंबर 2023 शनिवार रोजी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स आयोजित, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आशा वेणुगोपाल डिस्ट्रिक्ट 3030 संकल्पित उडान (गरजू विद्यार्थीनींसाठी सायकल वाटप) कार्यक्रम बापजी हॉस्पिटल च्या प्रांगणात संपन्न झाला यावेळी जवळ जवळ 119 हुन अधिक सायकली विद्यार्थीनीना श्री चोपडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या .
त्याचबरोबर समाज निर्मितीमध्ये अत्यंत महत्वाचे योगदान असलेले शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स च्या माध्यमातून समाजासाठी व विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य केलेल्या 8 शिक्षक व शिक्षिकांना रोटरी च्या नेशन बिल्डर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
राजाराम उगले, अजय घोरपडे, श्री अहिरराव सर, सुबोध वाघ, संजय वाघ, रवींद्र निकम, सौ सुनीता कासार, सौ कामिनी पाटील, सौ कविता शिंदे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यानंतर रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स व MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय प्रश्न मंजुषा चे बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला .यात पोदार स्कूल चे एम डी शामी, इशिता शिनकर,चिरायू कोठण, कलंत्री शाळेचे वेदांत पाटील, अंकिता पगारे, तेजस वाघ, एबी शाळेचे ओम देशमुख, साई महाले, कल्पेश पाटील, भावेश सोनवणे,श्रावणी सूर्यवंशी,तृप्ती गवारे , राष्ट्रीय विद्यालयाचे निकिता पाटील, चैताली पवार आणि पूर्णपात्रे शाळेचे ज्ञानदा महाजन यांना बक्षीस मिळाले.
अध्यक्ष रोटे हर्षद ढाके, बाळासाहेब चव्हाण, रोटे डॉ संदीप देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले . आभार प्रदर्शन सचिव डॉ विरजा देशमुख यांनी केले .
या कार्यक्रमासाठी रॉयल्स च्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रोटे. मधुकर कासार , रोटे. राज पुन्शी, रोटे. डॉ स्वप्नील शिंदे, रोटे. हरेश जैन, रोटे संदीप चव्हाण, रोटे पराग बढे आदींचे विशेष सहकार्य लाभले.






