आशाताई बच्छाव
कृषी कन्या नी बनवले गांडूळ खत.
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
(ब्युरो चीफ बुलढाणा)
जळगाव जामोद/डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा संचालित तसेच सातपुडा शिक्षण संस्था संलग्नित स्वातंत्रवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी पाटण ( वडगाव ) शेतकरी श्रीकृष्ण रामराव सोनोने यांच्या येथे माती विभागातील ‘गांडूळ खत’ चे आयोजन केले या मध्ये विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना गांडूळ खत बनवण्याची प्रक्रिया करून दाखवली ,त्या मध्ये १. बायोडिग्रेडेबल कचरा, पाणी,पीक अवशेष ,तन बायोमास,FYM,गांडूळ(Eisenia foetida). गांडूळ खत बनून झाल्यावर शेतकऱ्यांना गांडूळ खत वापरण्याचे फायदे व तोटे समजाऊन सांगीतले, गांडूळ खत हे एक जैविक शेतीच स्त्रोत्र आहे “जैविक शेती काळाची गरज” माती व पिकांवर त्याचा खूप चांगला प्रभाव पडत आहे ,या उपक्रमात प्राध्यापक योगेश गवई सर,कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश आटोळे, समन्वयक प्रा.विद्या कपले मॅम,आणि माती विभागाचे प्रा.समाधान काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये गट प्रमुख ऋतुजा मोहोळ, अंकिता कोठे, साक्षी सौदागर, प्रतीक्षा सौदागर, आरती सोळंके,ललिता लहरी.






