Home अमरावती श्रीमद् जगद्गुरु रामानंदचार्य स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार जन्मोत्सव रुक्मिणी महोत्सव ५ते१२...

श्रीमद् जगद्गुरु रामानंदचार्य स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार जन्मोत्सव रुक्मिणी महोत्सव ५ते१२ डिसेंबर पर्यंत भव्य कार्यक्रम.

38
0

आशाताई बच्छाव

IMG_20231205_180452.jpg

श्रीमद् जगद्गुरु रामानंदचार्य स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार जन्मोत्सव रुक्मिणी महोत्सव ५ते१२ डिसेंबर पर्यंत भव्य कार्यक्रम.
—————
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती (कौंडण्यपूर)
अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथे पीठाधीश तथा श्रीमद् जगद्गुरु रामानंदचार्य स्वामी राजेश्वर माऊली सरकार यांचा जन्मोत्सव व रुक्मिणी महोत्सव येणाऱ्या ५ते१२ डिसेंबर २०२३ या कालावधीत भव्य प्रमाणात सोहळा साजरा करणार आहे. मंगळवारी रोजी ५ डिसेंबर २०२३ला श्रीमद जगद्गुरु स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकारच्या मुख्य जन्मोत्सवाच्या पार्वावर कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १२ वाजता पासून सुरु होणार डिसेंबर २०२३ शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता श्री रुक्मिणी पीठ, श्री क्षेत्र अंबिकापुर–कौंडण्यपूर येथे आठ दिवसीय कार्यक्रमाची नियोजन आयोजित करण्यात आले. या बैठकीला मोठ्या संख्येने विश्वस्त, तथा पदाधिकारी बहुसंख्येने भाविक भक्तगण उपस्थिती दर्शविलेली आहे. ५ डिसेंबर२०२३ते११ डिसेंबर कौंडण्यपूर तीर्थक्षेत्र भूतो न भविष्य असा श्री शतचंडी महायज्ञ,११ डिसेंबर रोजी दुपारी११ते१ वाजता केसरी धर्मसभा बौद्धिक वर्ग सत्र, दुपारी २ते५ पर्यंत विद्यारंभ संस्कार, संध्याकाळी ६.३० श्री गंगा वशिष्ठ महाआरती, ७.३० संध्याकाळी रुक्मणी नामसंकीर्तन , साडेनऊ वाजतारात्री माऊली जागरता मंडळ भजन गायक जितेंद्र पाखरे व श्रीमद जगद्गुरु स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार जन्मोत्सव आनंद डिसेंबरला श्री रुक्मिणी महोत्सव ची सुरुवात सकाळी सहा वाजता श्री रुक्मिणी माता यांच्या पूजनाने होणार. व सकाळी आठ वाजता श्री रुक्मिणी रथयात्रा निघणार त्यानंतर भक्तीमय रस रंग कार्यक्रम गायक राम कृष्ण चक्रवर्ती करतील. श्रीमद जगद्गुरु राजेश्वर माऊली सरकार यांची पाद्यपूजा व त्यांच्या अमृत वाणीतून उद्भवधनचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. दुपारी काल्याचे कीर्तनासह गोपाळकाला होईल व महाप्रसादाचा वितरण कार्यक्रम होईल. तसेच या कार्यक्रमात प्रसंगी पारिवारिक व वैयक्तिक समस्याचे समाधान करिता मार्गदर्शन सुद्धा भाविकांना मिळणार आहे सर्व भाविकांनी गुरुमाऊली यांचे दर्शनाचा लाभ घ्यावा असे रुक्मिणी पीठ विश्वास समितीने आमच्या प्रतिनिधीला माहिती दिली आहे

Previous articleकृषी कन्या नी बनवले गांडूळ खत.
Next articleअमरावती येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या प्रतिमेस चपलेच हार टाकुन निषेध केला.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here