Home भंडारा लाखांदूर येथे बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या वतीने 12 डिसेंबरला भव्य धम्म संमेलनाचे...

लाखांदूर येथे बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या वतीने 12 डिसेंबरला भव्य धम्म संमेलनाचे आयोजन

138

आशाताई बच्छाव

IMG_20231205_174632.jpg

लाखांदूर येथे बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या वतीने 12 डिसेंबरला भव्य धम्म संमेलनाचे आयोजन

धम्मदूत संघरत्न मानके यांच्या हस्ते होणार बुद्ध विहाराच्या तालुकास्तरीय विहाराचे भूमिपूजन

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद ,रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, एडवोकेट दिलीप काकडे उपस्थित राहणार

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती लाखांदूर च्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 12 डिसेंबर 2023 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण पिंपळगाव रोड येथे सकाळी दहा वाजता तालुकास्तरीय बुद्ध विहार भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन धम्मदूत संघरत्न मानके यांच्या उपस्थितीत पार पडेल. त्यानंतर भव्य धम्म संमेलनाचे आयोजन दुपारी १ वाजता करण्यात आलेले आहे .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीम आर्मीचे मुख्य संस्थापक चंद्रशेखर आजाद उत्तर प्रदेश राहतील तर विशेष अतिथी म्हणून एडवोकेट दिलीप काकडे रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील त्याचप्रमाणे विशेष उपस्थिती पूज्य भंते प्रशिल रत्न संघकारा फाउंडेशन मुंबई उपस्थित राहतील त्याचप्रमाणे रात्री ८ वाजता लोकशाहीर सीमा पाटील मुंबई यांचा प्रबोधनात्मक आंबेडकरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीचे मुख्य संयोजक माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, संयोजक प्राध्यापक उद्धव रंगारी ,सल्लागार प्राध्यापक अनिल काणेकर ,प्रकाश बारसागडे, अरविंद रामटेके, बुद्धिस्त समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक संदीप मोटघरे ,सचिव बबन गजभिये ,ज्योतीताई रामटेके, नीरु मेश्राम ,अर्पणाताई जांगडे ,बिंदुताई रामटेके ,वनिताताई गायकवाड प्रयत्न करीत आहेत.

Previous articleनागपूर येथील नाट्य महोत्सवात साकोली संघाचे नेतृत्व भावेश कोटांगले & विनोद मुरकुटे करणार
Next articleकला पुरस्काराकरिता प्रबोधनकार तनुजा नागदेवे यांची निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.