Home भंडारा नागपूर येथील नाट्य महोत्सवात साकोली संघाचे नेतृत्व भावेश कोटांगले & विनोद मुरकुटे...

नागपूर येथील नाट्य महोत्सवात साकोली संघाचे नेतृत्व भावेश कोटांगले & विनोद मुरकुटे करणार

266

आशाताई बच्छाव

IMG_20231205_174304.jpg

नागपूर येथील नाट्य महोत्सवात साकोली संघाचे नेतृत्व भावेश कोटांगले & विनोद मुरकुटे करणार

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभागाच्या वतीने ६९ व नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी कामगार कल्याण केंद्र साकोली चे नेतृत्व भावेश कोटांगले & विनोद मुरकुटे आणि संच करणार आहे.
ही नाट्य महोत्सव स्पर्धा १ डिसेंबर २०२३ ते २५ डिसेंबर 2023 पर्यत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ८ डिसेंबर२०२३ ला कामगार कल्याण केंद्र साकोली केंद्र संचालक सतीश कुटे यांच्या नेतृत्वात दोन अंकी नाटक संगीत त्याग मातृत्वाचा ही नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे लेखक चंद्रशेखर श्राद्धे असून नाटकाचे दिग्दर्शक भावेश कोटांगले आणि नाट्य संकल्पना सूत्रधार विनोद मुरकुटे यांनी केली आहे
कामगार कल्याण भवन,राजे रघूजी नगर नागपूर येथे त्याग मातृत्वाचा या नाटकाचे सादरीकरण सायंकाळी ७ वाजता निशुल्क सादर होणार आहे

यामध्ये मुख्य कलाकार विनोद मुरकुटे, भावेश कोटांगले, चंद्रशेखर श्राध्ये, यशवंत गायकवाड, ईश्वर धकाते, यशवंत बागडे,सुभाष परशुरामकर, स्त्री कलावंत अर्चना कान्हेकर, वनश्री श्राध्ये, माधवी गेडाम, संगीत संच सोनू मेश्राम, वसंता राऊत,पार्श्वसंगीत संदीप कोटांगले, नेपथ्य मनोहर बोरकर,प्रकाश योजना बालू भुजाडे सहभागी होणार आहेत.

Previous articleकमको बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन गजानन (अण्णा) सोनजे यांचा “युवा मराठा न्यूज” कडून सत्कार!
Next articleलाखांदूर येथे बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या वतीने 12 डिसेंबरला भव्य धम्म संमेलनाचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.