Home जालना सतीश घाटगे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश :जायकवाडीत आले मराठवाड्याच्या हक्काचे पाणी

सतीश घाटगे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश :जायकवाडीत आले मराठवाड्याच्या हक्काचे पाणी

118

आशाताई बच्छाव

IMG_20231126_043155.jpg

सतीश घाटगे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश :जायकवाडीत आले मराठवाड्याच्या हक्काचे पाणी
——–
गावागावात शेतकऱ्यांचा जल्लोष : देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
——-
घनसावंगी/अंबड/जालना दिलीप बोंडे: तहानलेल्या मराठवाड्याला  उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधित अधिकाऱ्यांना शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण समूहातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जायकवाडीत शनिवारी सकाळी पाणी दाखल झाले. पाणी दाखल झाल्यानंतर अंबड – घनसावंगी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. पाणी सोडल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व न्यायालयीन लढ्याबद्दल सतीश घाटगे यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले. शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून फटाके फोडत पाणी सोडल्याचा जल्लोष साजरा केला.

मराठवाड्याचे पाणी अडविण्यासाठी  पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी दाखल केलेल्या याचीकेविरोधात समृद्धी साखर कारखान्यामार्फत सतीश घाटगे यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेला यश आले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेऊन सरकारला जायकवाडीत पाणी सोडण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार  सतीश  घाटगे यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना देण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २१ नोव्हेंबर रोजी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सतीश घाटगे यांच्या विनंतीची तातडीने दखल घेऊन  मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नाशिकच्या दारणा  धरण समूहातून  जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचे आदेश शुक्रवारी दिले. त्याची तातडीने अंमलबजावणी झाली असून शनिवारी सकाळी जायकवाडी धरणात पाणी दाखल झाले. जायकवाडीत पाणी येताच घनसावंगी – अंबड तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, येथे जल्लोष साजरा करण्यात आला

Previous articleनॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याचे पहिले गाळप शुभारंभ चे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते 28 नोव्हेंबरला लाखांदूर येथे होणार
Next articleठेंगोडा येथे सिध्दीविनायक गणेश मंदिरात चोरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.