Home जालना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

180

आशाताई बच्छाव

IMG_20231122_062157.jpg

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
———-
जालना,(दिलीप बोंडे)-: मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्यासह  मराठवाड्यातील अन्य साखर कारखानदार व संस्था मार्फत दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेला यश आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या आदेशाला स्टे देण्यासाठी दाखल केलेली याचीका सर्वोच्च न्यायालयाने अमान्य करत राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या पाणी सोडण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मराठवाड्याचे हक्काचे पाणी जायकवाडी धरणात येण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या आडमुठ धोरणामुळे दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्याचे पाणी अडवण्यात आले होते. १५ ऑक्टोबर २०२३  रोजीच्या  जायकवाडी धरणातील पाण्याच्या स्थितीनुसार आणि समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार  ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत  8.603 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.परंतु, पश्चिम महाराष्ट्रातील पद्मश्री विखे पाटील कारखाना व संजिवनी कारखान्याने या आदेशा विरोधात सुप्रीम कोर्टात याचीका दाखल केली होती. त्यामुळे पाणी सोडण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासविलंब होत  होता.  याविरोधात सतीश घाटगे यांनी समृद्धी साखर कारखान्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखला केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेले आदेश कायम ठेवत जायकवाडी धरणात मराठवाड्याच्या हक्काचे  8.603 टीएमसी पाणी सोडण्याच्या आदेशाला स्टे देण्याची विनंती अमान्य केली.

Previous articleबेकायदेशीर लोह खाणींविरोधात हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार
Next articleफटाके फोडण्याच्या कारणातून पिंपरखेड तांडा येथे हाणामारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.