Home जालना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार  पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार  पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे

232

आशाताई बच्छाव

IMG_20231110_183220.jpg

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार

पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

 

जालना (दिलीप बोंडे) :-  राज्यस्तरीय शालेय खो-खो व बेसबॉल स्पर्धां जालना जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुला-मुलींना निवासासह भोजनाची उत्तम सोय उपलब्ध करुन द्यावी तसेच संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

राज्यस्तरीय शालेय खो-खो व बेसबॉल स्पर्धा आयोजनाबाबतची पुर्व तयारी आढावा बैठक शुक्रवार दि.10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुला-मुलींना विभागनिहाय वेगवेगळ्या रंगाचा ट्रॅकसुट उपलब्ध करुन देण्यात यावा तसेच ट्रॅकसुटवर सुस्पष्ट विभागनिहाय नावे मुद्रीत करावी. विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या पारितोषिकात नामांकित कंपनीच्या स्पोर्ट वॉचचा समावेश करावा. तुमच्या डोक्यात काही नवनवीन संकल्पना असल्यास मला सांगा, त्यांचाही विचार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी वर्ष 2023-24 या वर्षात 14 वर्षाखालील मुला-मुलींसाठी  राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धां जालना शहर महानगरपालिकेजवळील जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये दि.22 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

Previous articleपहेला येथे मंडई निमित्त 21 नोव्हेंबरला व्यथा दोन पाखरांची या नाटकाचे आयोजन
Next articleअवैध वाहतुक होत असलेला ४० क्वि.तांदुळ जप्त करजगावात तहसिलदारांची कारवाई सिरजगाव पोलीसात गुन्हा दाखल.         
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.