Home अमरावती अवैध वाहतुक होत असलेला ४० क्वि.तांदुळ जप्त करजगावात तहसिलदारांची कारवाई सिरजगाव पोलीसात...

अवैध वाहतुक होत असलेला ४० क्वि.तांदुळ जप्त करजगावात तहसिलदारांची कारवाई सिरजगाव पोलीसात गुन्हा दाखल.         

109
0

आशाताई बच्छाव

IMG_20231112_113431.jpg

अवैध वाहतुक होत असलेला ४० क्वि.तांदुळ जप्त
करजगावात तहसिलदारांची कारवाई
सिरजगाव पोलीसात गुन्हा दाखल.                    (फोटो)
मयुर खापरे चादुंर बाजार
चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथुन मोर्शीकडे तांदुळाची अवैध वाहतुक करणार्‍या मालवाहु वाहनातील ६५ कट्टे अंदाजे ४० क्वि. तांदुळ तहसिलदार गितांजली गरड यांचे नेतृत्वातील पथकाने जप्त करुन वाहन चालकावर सिरजगाव कसबा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई शुक्रवारी सकाळी ७ वाजता करण्यात आली.हा तांदुळ करजगाव वरुन नेरपिंगळाई येथे नेला जात होता.सदरचा तांदुळ रेशनचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या रेशनचा तांदुळ आणि गहु प्राधान्य व अंतोदय कार्ड धारकांना मोफत वितरण केला जात आहे.चांदूरबाजार तालुक्यात एकुण १४३ रेशन दुकाने आहेत.यात महिन्याकाठी तहसिल पुरवठा विभागाकडुन ९ हजार ५०० क्वि.गहु व तांदुळाचा रेशन दुकानांना पुरवठा केल्या जातो.त्यात तांदुळाचा सर्वाधिक ७ हजार ५०० क्वि. तांदुळाचा पुरवठा होतो.करजगावात रेशनची सहा दुकाने आहेत.तेथे ८०० क्वि. गहु व तांदुळाचा पुरवठा होतो.त्यात सर्वाधिक ६०० क्वि. तांदुळाचा पुरवठा होतो.
हे सर्व रेशन दुकानातुन वितरण होणारे धान्य प्राधान्यक्रम व अंतोदय कार्ड धारकांना मोफत दिले जाते.यात तांदुळाचे वाटप माणसी ४ किलो असल्याने तांदुळाचे वाटप अधिक प्रमाणात होते.यातील बरेचशे कार्डधारक रेशनमधुन मिळालेला तांदुळ बाजारात विक्री करीत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.याच प्रकारातुन हा तांदुळ करजगावात खरेदी करण्यात आला व नेरपिंगळाईच्या व्यापार्‍याने खरेदी केला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
करजगाव येथे झालेल्या कारवातीत मालवाहु वाहन क्र.एम एच २३ बीएक्स ७६९२ या वाहनातुन ६५ कट्टे (४० क्वि.) तांदुळ जप्त करण्यात आला.सदरची कारवाई तहसिलदार गातांजली गरड,निरीक्षण अधिकारी रुपेश बिजेवार,गोदाम व्यवस्थापक राहुल केदारे,सुमेद सोनोने यांनी केली.तांदळाचे वाहन पोलीसात जमा केले असून सिरजगाव कसबा पोलीसांनी वाहन चालक गजानन गायकवाड नेरपिंगळाई ता.मोर्शी याला अटक करुन त्याचेवर जिवनावश्यक अधिनियम ३/७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती पुरवठा विभागाकडुन देण्यात आली.
वाहन चालक गजानन गायकवाड याने पोलीसांना दिलेल्या बयानात सदरचा तांदूळ शेख जुबेर करजगाव यांचे कडुन खरेदी केला असून नेरपिंगळाई येथील पंकज बरडे यांचे कडे नेत असल्याचे सांगीतल्याची माहीती पुरवठा निरीक्षण अधिकारी रुपेश बिजेवार यांनी दिली.जप्त वाहन सिरजजगाव पोलिसात दिले असून पुढील तपास सिरजगाव कसबाचे ठाणेदार प्रविण कुरुळेकर यांचे मार्गदर्शनात सिरजगाव पोलीस करीत आहे.

Previous articleराज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार  पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे
Next articleदिवाळीचे आरोग्यदायी शास्त्रशुद्ध महत्त्व….. डॉ.अक्षय कहालकर, एम.डी. (कआरओ) कायरोप्रॅक्टर व निसर्गोपचार तज्ज्ञ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here