Home जालना पाण्यासाठी शेतकऱ्यांना  रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका – सतीश घाटगे  

पाण्यासाठी शेतकऱ्यांना  रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका – सतीश घाटगे  

113

आशाताई बच्छाव

IMG_20231107_060241.jpg

पाण्यासाठी शेतकऱ्यांना  रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका – सतीश घाटगे
८ नोव्हेंबर पर्यंत जायकवाडीत पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाच इशारा

घनसावंगी/अंबड/जालना-दिलीप बोंडे : पाटबंधारे विकास महामंडळाने आदेश देऊनही जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील  धरणातून साडेआठ टीएमसी पाणी सोडण्यात आलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या आडमुठ धोरणामुळे दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या  मराठवाड्याचे पाणी अडवण्यात आले आहे.  राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन मराठवाड्याच्या हक्काचे पाणी तत्काळ सोडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश प्राधिकरणास द्यावे, ८ नोव्हेंबर पर्यंत मराठवाड्याच्या हक्काचे  पाणी  जायकवाडी धरणात न आल्यास, ९ नोव्हेंबर पासून हक्काच्या पाण्यासाठी आणि पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या नेत्यांची खोड मोडण्यासाठी शेतकऱ्यांसोबत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्यानुसार राज्यातील धरणातील उपलब्ध  पाण्याचे  समन्यायी वाटप करण्याचे धोरण आखलेले आहे.    मराठवाड्यातील शेतकऱ्यांना  हक्काच्या  पाण्यासाठी  प्रत्येक वेळी संघर्षच करावा लागत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या आडमुठ धोरणामुळे सध्या  दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या  मराठवाड्याचे पाणी आदेश देऊनही सोडण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत जायकवाडी धरणाच्या वरील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.  15 ऑक्टोबर २०२३  रोजीच्या  जायकवाडी धरणातील पाण्याच्या स्थितीनुसार आणि समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार  31 ऑक्टोबर २०२३ पर्यंत  8.603 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Previous articleदेवाच्या नामाने व संताच्या अमृत वचनामुळे जीवन सफल होते- ह.भ.प. योगीराज महाराज लोखंडे
Next articleवृद्ध आई वडीलांची काळजी घ्यावी – ॲड. महेंद्र गोस्वामी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.